BRO Bharti 2026: नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग ही जाहिरात तुमच्यासाठी कारण BRO अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या board road organisation ही भरती करण्यात येत असून यामध्ये एकूण 919 पदे भरण्यात येत आहेत.
प्रस्तुत भरतीची जाहिरात ही BRO च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून,पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच निवड पद्धती संदर्भात अधिक माहिती खालील लेखात देण्यात आली आहे.मात्र उमदेवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
सविस्तर तपशील
| घटक | माहिती |
| भरती संस्था | BRO (board road organisation) |
| एकूण जागा | 919 पदे |
| पदाचे नाव | विविध रिक्त पदे |
| अर्ज सुरू तारीख | 21 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 जुलै 2026 |
| अर्ज पद्धत | ऑफलाईन |
| शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
| वयोमर्यादा | 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावे. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| अधिकृत संकेतस्थळ | https://bro.gov.in/ |
BRO Bharti 2026 सदर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात पदांची संख्या असल्यामुळे पात्रता धारक उमदेवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
रिक्त पदे
- स्टोर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical -SKT): 300 जागा
- ऑपरेटर कम्युनिकेशन (Operator Communication): 261 जागा
- ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशीनरी (OEM Ordinary Grade): 207 जागा
- इलेक्ट्रिशियन (Electrician): 79 जागा
- ड्राफ्टमॅन (Draughtsman): 42 जागा
- हिंदी टायपिस्ट (Hindi Typist): 10 जागा
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- ड्राफ्टमॅन (Draughtsman): विज्ञान शाखेतून 12 वी (10+2) उत्तीर्ण केलेली असावी. सोबतच मान्यताप्राप्त संस्थेतून आर्किटेक्चर किंवा ड्राफ्टमॅनशिपचा 2 वर्षांचा डिप्लोमा किंवा ड्राफ्टमॅन (सिव्हिल) मधील राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) आणि 1 वर्षाचा अनुभव असावा.
- हिंदी टायपिस्ट (Hindi Typist): 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.आणि संगणकावर हिंदी टायपिंगचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे.
- स्टोर कीपर टेक्निकल (SKT): 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.तसेच वाहने किंवा इंजिनिअरिंग उपकरणांशी संबंधित स्टोअर कीपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- ऑपरेटर कम्युनिकेशनः 10 वी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय (ITI) मधून वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिकचे प्रमाणपत्र धारक असावा.
- ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशीनरी (OEM): उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे अवजड वाहन चालक परवाना (Heavy Driving Licence) असणे गरजेचे आहे.
- इलेक्ट्रिशियन (Electrician): 10 वी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय (ITI) मधून ऑटो इलेक्ट्रिशियन प्रमाणपत्र व 1 वर्षाचा अनुभव असावा.
- (शैक्षणिक पात्रते बद्दल अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचावी)
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय 18 वर्षे
- कमाल वय 27 वर्षे
- SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
- इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट
- दिव्यांग उमेदवार (PWBD): 10 वर्षे सूट
निवड प्रक्रिया (Selection Process)
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- ट्रेड/प्रात्यक्षिक चाचणी
- कागदपत्र पडताळणी
पगार (Salary)
निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
| पदाचे नाव | वेतन |
| ड्राफ्ट्समन | वेतन बँड-1, रु. 5200-20200 अधिक ग्रेड वेतन रु. 2800/- |
| हिंदी टंकलेखक | वेतन बँड-1, रु. 5200-20200 अधिक ग्रेड वेतन रु. 1900/- |
| स्टोअर कीपर (तांत्रिक) | वेतन बँड-1, रु. 5200-20200 अधिक ग्रेड वेतन रु. 1900/- |
| ऑपरेटर (दळणवळण) | वेतन बँड-1, रु. 5200-20200 अधिक ग्रेड वेतन रु. 1900/- |
| ऑपरेटर (उत्खनन यंत्रसामग्री) (OG) | वेतन बँड-1, रु. 5200-20200 अधिक ग्रेड वेतन रु. 1900/- |
| इलेक्ट्रिशियन | वेतन बँड-1, रु. 5200-20200 अधिक ग्रेड वेतन रु. 1900/- |
अर्ज फी (Application Fee)
- General/OBC उमेदवारांसाठी: 50/- रुपये
- SC/ST उमेदवारांसाठी: फी नाही
- (अर्ज फी ना परतावा आहे)
आवश्यक कागदपत्रे (Required Document)
- फोटो आणि सही
- आधारकार्ड
- 10 वी/12 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जातीचा दाखल (लागू असल्यास)
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा
BRO Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)
- प्रस्तुत भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज नमुना खाली देण्यात आला आहे.त्याची प्रिंट कडून व्यवस्थित रित्या भरून घ्या.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- Commandant, GREF Centre, Dighi Camp, Pune – 411015
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.त्यासाठी अर्ज हा पूर्णपणे भरलेला असावा.कोणताही अर्ज अपूर्ण असेल तर तो बाद केला जाऊ शकतो याची काळजी घ्यावी.
- अर्जामध्ये अचूक माहिती प्रविष्ट करावी कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे स्पष्ट होत असल्याचे आढळून आल्यास निवड किंवा अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात pdf नक्की वाचावी.
निष्कर्ष
BRO Bharti 2026 या भरतीमध्ये निवड होण्या म्हणजे थेट देश सेवेची संधी आणि भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी उभे राहून काम करणे होय.तसेच भारत सरकारच्या अधिपत्याखाली नोकरी आहे.त्यामुळे पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज विहित तारखे पर्यंत करावा.
हि जाहिरात पण बघा: Punjab and Sind Bank Bharti 2026: 635 जागांसाठी भरती सुरू; थेट ऑनलाइन अर्ज करा