MMRCL Bharti 2026: मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी असणार आहे.या भरतीमध्ये एकुण 24 पदे भरण्यात येत असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रस्तुत भरतीची जाहिरात ही MMRCL च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व अधिक माहिती खालील लेखात देण्यात आली आहे.या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
सविस्तर तपशील
| घटक | माहिती |
| भरती संस्था | MMRCL |
| एकूण जागा | 24 |
| पदाचे नाव | विविध रिक्त पदे |
| अर्ज सुरू तारीख | 27 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 जून 2026 |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
| वयोमर्यादा | किमान 18 वर्षे |
| नोकरी ठिकाण | मुंबई |
| अधिकृत संकेतस्थळ | https://mmrcl.com/ |
MMRCL Bharti 2026 प्रस्तुत भरतीमध्ये निवड होण्या म्हणजे चांगल्या पदावरती नोकरी मिळवणे होय
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार देण्यात आलेली आहे.त्यामुळे मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय 18 वर्षे
- कमाल वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे.
- SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
- इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट
- दिव्यांग उमेदवार (PWBD): 10 वर्षे सूट
निवड प्रक्रिया (Selection Process)
- प्रत्यक्ष मुलाखत (Personal Interview)
पगार (Salary)
निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
| पदाचे नाव | वेतन |
| महाव्यवस्थापक (स्थापत्य) | रु. 1,20,000-2,80,000 |
| महाव्यवस्थापक (इमारती आणि देखभाल) | रु. 1,20,000-2,80,000 |
| उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य/इमारती) | रु. 80,000-2,20,000/- |
| उपमहाव्यवस्थापक (MEP/इमारत सेवा आणि समन्वय) | रु. 80,000-2,20,000/- |
| उपमहाव्यवस्थापक (लेखा) | रु. 80,000-2,20,000/- |
| सहाय्यक महाव्यवस्थापक (संरचना) | रु. 70,000-2,00,000/- |
| सहाय्यक महाव्यवस्थापक (भू-तांत्रिक) | रु. 70,000-2,00,000/- |
| सहाय्यक महाव्यवस्थापक (नगर नियोजन) | रु. 70,000-2,00,000/- |
| सहाय्यक महाव्यवस्थापक (PST) | रु. 70,000-2,00,000/- |
| सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त) | रु. 70,000-2,00,000/- |
| सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त) | रु. 70,000-2,00,000/- |
| व्यवस्थापक (वित्त) | रु. 60,000-1,80,000/- |
| उपअभियंता (PST) | रु. 50,000-1,60,000/- |
| सहाय्यक व्यवस्थापक (वास्तुविशारद) | रु. 50,000-1,60,000/- |
| सहाय्यक व्यवस्थापक (AFC / O & M) | रु. ५०,०००-१,६०,०००/- |
| सहाय्यक व्यवस्थापक (IT) | रु. ५०,०००-१,६०,०००/- |
| सिस्टम्स ॲनालिस्ट/कनिष्ठ अभियंता-I | रु. ४०,३२०-७७,५४०/- |
| ड्राफ्ट्समन (स्थापत्य/वास्तुशिल्प) | रु. ३५,२८०-६७,९२०/- |
| कनिष्ठ अभियंता – II (S&T) | रु. ३५,२८०-६७,९२०/- |
| सहाय्यक (IT) | रु. ३४,०२०-६४,३१०/- |
अर्ज फी (Application Fee)
- जाहिरातीमध्ये अर्ज फी संदर्भात कोणताही उल्लेख केलेला नाही त्यामुळे फी नसल्याची शक्यता असू शकते.
आवश्यक कागदपत्रे (Required Document)
- फोटो आणि सही
- आधारकार्ड
- 10 वी/12 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जातीचा दाखल (लागू असल्यास)
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा
MMRCL Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)
उमेदवारांनी केवळ MMRCL च्या अधिकृत संकेतस्थळाद्वारेच (website) ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे
- यामुळे MMRCL च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
- MMRCL Recruitment Advertisement 2026 या वरती क्लिक करा.
- Registration वरती क्लिक करून नोंदणी करून द्या.
- Login करा आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
- पदाच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज Submit करून अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी केवळ (MMRCL Bharti 2026) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध email id आवश्यक आहे.
- अर्ज करण्याच्या इतर कोणत्याही पद्धती स्वीकारल्या जाणार नाहीत
- भरती प्रक्रियेदरम्यान हा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक कार्यरत (active) ठेवणे गरजेचे आहे. MMRCL वैयक्तिक मुलाखतीबाबतची सूचना आणि तुमच्या अर्जाशी संबंधित इतर कोणतीही माहिती केवळ तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीद्वारेच पाठवेल.
- ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून सुरू होईल आणि दिनांक 26 जून 2026 रोजी रात्री 23:59 वाजता संपेल. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी, उमेदवारांना पुरेसा आधीच अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.
- नेटवर्कची समस्या किंवा या स्वरूपाची इतर कोणतीही अडचण, तसेच शेवटच्या दिवसांमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे ऑनलाईन अर्ज सादर न झाल्यास, त्यासाठी MMRCL जबाबदार राहणार नाही.
- ऑनलाईन अर्जामधील सर्व रकाने (fields) काळजीपूर्वक भरले जावेत. अर्ज सादर केल्यानंतर, त्यामध्ये कोणताही बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत अद्ययावत ‘रेझ्युमे’ची (Resume) स्कॅन केलेली प्रत, पासपोर्ट आकाराचा छायाचित्र (.jpg/.jpeg स्वरूपात) आणि अलीकडील वेतन स्लिप (.pdf स्वरूपात) अपलोड करणे आवश्यक आहे.
- उमेदवार ज्या रिक्त पदासाठी अर्ज करत आहेत, त्या पदाचा विचार ‘नियमित’ (Regular), ‘कंत्राटी’ (Contract) किंवा ‘प्रतिनियुक्ती’ (Deputation) यापैकी कोणत्या आधारावर केला जावा, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
- शासकीय क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज, खाली दिलेल्या टपाल पत्त्यावर विहित नमुन्यात खालील कागदपत्रांसह पाठवणे आवश्यक आहे.
निष्कर्ष
MMRCL Bharti 2026 सदर भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना चांगले वेतन मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पात्रता धारक उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.
हि जाहिरात पण बघा BRO Bharti 2026: 10वी, 12वी, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! 919 जागांची भरती