SSB Constable GD Bharti 2026 10 वी उत्तीर्ण उमदेवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण SSB अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.सरकारी विभागात नोकरी आणि देशसेवेची मोठी सुवर्णसंधी उमदेवारांना मिळणार आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालय अंतर्गत असलेल्या SSB ने कॉन्स्टेबल (General Duty) या पदासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित केली आहे.
प्रस्तुत भरती ही स्पोर्ट कोटा अंतर्गत होत असून यामध्ये एकूण 404 पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्रता धारक उमदेवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे निर्देश देण्यात आले आहेत.आपल्या करिअरची सुरवात सरकारी नोकरी पासून करण्याची उत्तम संधी आहे.या भरतीसाठी 09 जून 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली असून,आपला अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नक्की वाचावी.
| घटक | माहिती |
| भरती संस्था | सशस्त्र सीमा बल (SSB) |
| एकूण जागा | 0404 |
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल (General Duty) |
| अर्ज सुरू तारीख | 09 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची | तारीख 09 जून 2026 |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| शैक्षणिक पात्रता | 10 वी उत्तीर्ण (स्पोर्ट कोटा) |
| वयोमर्यादा | 18 वर्ष ते 23 वर्ष |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| अधिकृत संकेतस्थळ | https://ssb.gov.in/ |
प्रस्तुत (SSB )भरतीमध्ये विशेष म्हणजे महिला आणि पुरुष दोघांना अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- या भरतीसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- क्रीडा पात्रता: मागील 02 वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे किंवा नॅशनल चॅम्पियनशिप/खेलो इंडिया गेम्समध्ये विजेते पदक असावेत.
वयोमर्यादा ( Age Limit)
- उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट
- SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
निवड प्रक्रिया (Selection Process)
- बायोमेट्रिक पडताळणी आणि कागदपत्रांची तपासणी
- क्रीडा कामगिरी तपासणी
- शारीरिक मानक चाचणी
- वैद्यकीय तपासणी
पगार (Salary)
- निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
- दरमहा २१,७००/- रुपये ते रु.६९,१००/- रुपये आणि इतर सरकारी भत्ते लागू असतील.
अर्ज फी (Application Fee)
- General/OBC/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक:- 100/रुपये
- SC/ST/महिला :- फी नाही
आवश्यक कागदपत्रे (Required Document)
- फोटो आणि सही
- आधारकार्ड
- 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
- स्पोर्ट कोटा प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा
SSB Constable GD Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)
Step 1: Registration (नोंदणी कशी करायची?)
- सर्वप्रथम SSB च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि “Registration / New” वर क्लिक करा.
- तुमचं First Name, Father Name आणि Surname CAPITAL letters मध्ये भरा.
- DOB select करा, Email ID आणि Mobile Number टाका.
- संपूर्ण माहिती भरून Registration करून घ्या.
Step 2: Login & Password Change
- आता Registration ID आणि password वापरून login करा. अधिक माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
Step 3: Document Upload
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Step 4: Preview & Payment
- संपूर्ण form preview करा. काही चूक असेल तर “Modify” करून दुरुस्ती करा. नंतर UPI / Card / Net Banking ने payment करा.
- Payment झाल्यानंतर application form आणि receipt download करून print घ्या
SSB Constable GD Bharti 2026 Apply Link
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध email id असणे आवश्यक आहे.
- या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही प्रामुख्याने क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी आणि शारीरिक चाचणीवर आधारित असेल. यामध्ये सर्वात आधी बायोमेट्रिक तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल,त्यानंतर उमेदवारांच्या क्रीडा कामगिरीनुसार गुणांकन दिले जाईल याची नोंद घ्यावी.
- भरतीसाठी कागदपत्र पडताळणी, क्षेत्रीय चाचणी, शारीरिक मानक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावलेल्या सर्व उमेदवारांनी ओळख इत्यादीसाठी त्यांना जारी केलेले प्रवेशपत्र सोबत आणावे. ज्या उमेदवारांकडे जारी केलेले प्रवेशपत्र नसेल, त्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाणार नाही.
- केवळ पात्र उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अधिसूचनेतील सर्व तरतुदी काळजीपूर्वक वाचून खात्री करावी की, ते ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्यासाठी ते पात्र आहेत.
- उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे, म्हणजेच मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र, क्रीडा कामगिरी प्रमाणपत्रे इत्यादी, त्यांच्या स्व-साक्षांकित छायाप्रतींसह आणावीत. असे न केल्यास, भरतीच्या कागदपत्र पडताळणीच्या टप्प्यात उमेदवारांची उमेदवारी नाकारली जाईल. या संदर्भात SSB तर्फे नंतरच्या टप्प्यात कोणतेही अपील स्वीकारले जाणार नाही.
- नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख मॅट्रिक प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणेच असावी. बदल झाल्यास, त्यास आवश्यक कागदपत्रांचा आधार देणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवारी नाकारली जाईल.
- अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
निष्कर्ष
- SSB Constable GD Bharti 2026 ही 10 वी उत्तीर्ण आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. महिला आणि पुरुष दोघांनाही अर्ज करता येणार असून, आकर्षक पगारासह देशसेवेची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि पात्रता निकष काळजीपूर्वक तपासणे अत्यंत आवश्यक आहे
हि जाहिरात पण बघा :- Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026|आरोग्य विभागात 75 जागांची भरती,थेट मुलाखत
1 thought on “SSB Constable GD Bharti 2026: 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! एकूण404 जागा”