NABARD Recruitment 2026: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती 2026

NABARD Recruitment 2026: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (National Bank For Agriculture & Rural Development) अंतर्गत 162 पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.प्रस्तुत भरती ही NABARD च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून, पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी 03 फेब्रुवारी 2026 ही अंतिम दिनांक देण्यात आली आहे.या भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
विकास सहाय्यक गट ‘ब’, विकास सहाय्यक (हिंदी) गट ‘ब’ 162

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
विकास सहाय्यक गट ‘ब’, विकास सहाय्यक (हिंदी) गट ‘ब’ उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असावी (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात pdf वाचावी)

वयोमर्यादा (Age Limit)

  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
  1. General (सामान्य)- 18 वर्ष ते 35 वर्ष
  2. SC/ST – अधिक 05 वर्ष
  3. OBC – अधिक 03 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था (CSIO) भरती 2026| 10 वी/12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  1. General- उमेदवारांसाठी – 450/- रुपये
  2. SC/ST/PWBD/EXS उमेदवारांसाठी – 50/- रुपये
  • (टीप:अर्ज फी न परतावा आहे Non Refundable)

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी NABARD अधिकृत वेबसाइट वर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज Submit करा
  6. अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 17 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  03 फेब्रुवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. पूर्व परीक्षा (Prelims)
  2. मुख्य परीक्षा (Mains)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही NABARD च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

NABARD Recruitment 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
  3. पदवी वी उत्तीर्ण गुणपत्रक
  4. जातीचा दाखला (लागू लागल्यास)
  5. नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  6. आधार कार्ड/पॅन कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा 14,650/- रुपये पर्यंत

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी प्रविष्ट करावा.
  2. ऑनलाइन परीक्षेसाठी (टप्पा I आणि II) प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी नाबार्डच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासंबंधीची सूचना Email/SMS द्वारे देखील पाठवली जाईल.
  3. या भरतीसाठी(NABARD) परीक्षेच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या रिपोर्टिंग वेळेनंतर उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रवेशपत्रावर नमूद केलेली रिपोर्टिंग वेळ ही परीक्षेच्या सुरुवातीच्या वेळेच्या आधीची आहे. जरी परीक्षेचा कालावधी तीन तास असला तरी, विविध कागदपत्रांची पडताळणी आणि संकलन, लॉग-इन करणे, सूचना देणे यांसारख्या विविध औपचारिकता पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेसह उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सुमारे 4 तास उपस्थित राहावे लागू शकते याची नोंद घ्यावी.
  4. शासकीय/निम-शासकीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका/उपक्रमांमध्ये आधीच सेवेत असलेल्या अर्जदारांना मुलाखतीच्या वेळी त्यांच्या नियोक्त्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे लागेल. बँकेत नियुक्तीपूर्वी, अर्जदाराला नियोक्त्याकडून योग्य सेवामुक्ती प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  5. परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही अर्जदाराला कॅल्क्युलेटर, मोबाईल फोन, ब्लूटूथ उपकरणे किंवा इतर कोणतेही उपकरण/साधन/गॅझेट वापरण्याची किंवा जवळ बाळगण्याची परवानगी नाही याची काळजी घ्यावी.
  6. वरील जाहिरातीसंदर्भात कोणतीही शुद्धीपत्रक किंवा पुढील घोषणा प्रसिद्ध झाल्यास, ती केवळ बँकेच्या www.nabard.org या वेबसाइटवरच प्रकाशित केली जाईल.
  7. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

NABARD Recruitment 2026- नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.कारण या भरतीमध्ये निवड होणे म्हणजे स्थिर नोकरी, चांगला पगार, आणि देशाच्या विकासात थेट योगदान देण्याची संधी नाबार्ड देते.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment