Bank of Baroda Bharti 2026| बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

सरकारी अपडेट

Bank of Baroda Bharti 2026| बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

शेवटची तारीख 06/02/2026
🔴 ही भरती बंद झाली आहे
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 फेब्रुवारी 2026 होती. सध्या अर्ज स्वीकारले जात नाहीत.

Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 04 जागा भरण्यात येत असून,पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीची जाहिरात ही बँक ऑफ बडोद्याच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीसाठी उमेदवारांना 06 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपले अर्ज करता येणार आहे.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धती याविषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव पद संख्या 
VP: Head- AI01
VP: Head Platform Engineering01
DVP: Dy. Head Cloud CoE (Centre of Excellence)01
DVP: Dy. Head IT Infrastructure01

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
VP: Head- AIकॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी+ किमान 12 वर्षांचा तांत्रिक आणि आयटी अनुभव, त्यापैकी 6 वर्षांचा अनुभव आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि कंटेंट ॲनालिसिसमध्ये पदवी मिळाल्यानंतरचा असावा.
VP: Head Platform Engineering

कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बी.ई./बी.टेक. + किमान 12 वर्षांचा तांत्रिक आणि आयटी अनुभव, त्यापैकी शक्यतो 6 वर्षांचा अनुभव क्लाउड कम्प्युटिंगच्या क्षेत्रात असावा.

DVP: Dy. Head Cloud CoE (Centre of Excellence)

कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बी.ई./बी.टेक. + किमान 10 वर्षांचा तांत्रिक आणि आयटी अनुभव, त्यापैकी किमान 5वर्षांचा अनुभव क्लाउड कम्प्युटिंगच्या क्षेत्रात असावा.

DVP: Dy. Head IT Infrastructureकॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये बी.ई./बी.टेक. (प्राधान्य: पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी आणि TOGAF, ITIL, CISSP, किंवा संबंधित प्रमाणपत्रांसारखी सर्टिफिकेशन्स) + किमान 10 वर्षांचा तांत्रिक आणि आयटी क्षेत्रातील अनुभव, ज्यापैकी किमान 05 वर्षांचा अनुभव इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटच्या क्षेत्रात असावा.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  1. VP: Head- AI – 38 वर्ष ते 48 वर्ष
  2. VP: Head Platform Engineering – 38 वर्ष ते 48 वर्ष
  3. DVP: Dy. Head Cloud CoE (Centre of Excellence) – 35 वर्ष ते 45 वर्ष
  4. DVP: Dy. Head IT Infrastructure – 35 वर्ष ते 45 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था (CSIO) भरती 2026| 10 वी/12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  1. खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 850/- रुपये
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 175/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बँक ऑफ बडोद्याच्या वेबसाइट वर भेट द्या.
  2. Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज Submit करा
  6. अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 17 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  06 फेब्रुवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. ऑनलाइन चाचणी
  2. सायकोमेट्रिक चाचणी किंवा पुढील निवड प्रक्रियेसाठी योग्य वाटणारी इतर कोणतीही चाचणी
  3. मुलाखत

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF)येथे बघा 
ऑनलाईन अर्जयेथे बघा 
अधिकृत वेबसाइटयेथे बघा 

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही Bank Of Baroda च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

Bank of Baroda Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
  3. पदवी वी उत्तीर्ण गुणपत्रक
  4. अनुभव प्रमाणपत्र
  5. आधार कार्ड/पॅन कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • Bank Of Baroda च्या अधिकृत नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे.

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  2. या भरतीसाठी निवडलेल्या उमेदवाराला एक गोपनीयता करार (नॉन-डिस्क्लोजर ॲग्रीमेंट) स्वाक्षरी करून द्यावा लागेल याची नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी वर नमूद केलेल्या अंतिम तारखेनुसार, अर्ज केलेल्या पदासाठी आपली पात्रता तपासून खात्री करून घ्यावी आणि त्यांनी दिलेली माहिती सर्व बाबतीत अचूक असल्याची खात्री करावी.
  4. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास, फक्त शेवटचा वैध (पूर्ण) अर्ज विचारात घेतला जाईल. एकाच पदासाठी मुलाखतीत उमेदवाराची एकापेक्षा जास्त वेळा उपस्थिती आढळल्यास, त्याचा अर्ज तात्काळ रद्द केला जाईल तसेच उमेदवारी रद्द केली जाईल.
  5. सरकारी/निम-सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, ज्यात राष्ट्रीयीकृत बँका आणि वित्तीय संस्थांचा समावेश आहे, अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी मुलाखतीच्या वेळी किंवा बँकेला (Bank of Baroda Bharti 2026)जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यांच्या नियोक्त्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे, अन्यथा त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाणार नाही. निवड झाल्यास, उमेदवारांना नियुक्ती स्वीकारताना नियोक्त्याकडून कार्यमुक्त पत्राची आणि लागू असेल तेथे संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरीची आवश्यकता असेल.
  6. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आल्यास की उमेदवार पात्रतेचे निकष पूर्ण करत नाही किंवा उमेदवारांनी कोणतीही चुकीची/बनावट माहिती दिली आहे किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर उमेदवारी रद्द केली जाईल. नियुक्तीनंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास, सेवा कोणत्याही सूचनेशिवाय संपुष्टात आणली जाऊ शकते.
  7. पात्रता, मुलाखतींचे आयोजन, इतर चाचण्या आणि निवड यासंबंधीच्या सर्व बाबींमध्ये बँकेचे निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांवर बंधनकारक असतील. या संदर्भात बँकेकडून कोणत्याही निवेदनावर किंवा पत्रव्यवहारावर विचार केला जाणार नाही.
  8. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी अशी विनंती केली जाते.

निष्कर्ष

Bank of Baroda Bharti 2026-बँक ऑफ बडोदा सारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीयीकृत बँकेत वरिष्ठ पदावर काम करण्याची सुवर्णसंधी या भरतीमुळे उपलब्ध झाली आहे.त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारीख 06 फेब्रुवारी 2026 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment