Deola Merchants Cooperative Bank Bharti 2026:दि देवळा मर्चटस् को-ऑप.बँक लि.देवळा अंतर्गत नवीन भरती प्रकाशित

Deola Merchants Cooperative Bank Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण, महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या दि देवळा मर्चटस् को-ऑप. बँक लि.देवळा मध्ये ‘लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि भरती संदर्भातील अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यासाठी 26 जानेवारी 2026 ही अंतिम दिनांक देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
लिपीक 07

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
लिपीक
  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण केलेली असावी
  2. MS-CIT किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र आवश्यक आहे (मूळ pdf जाहिरात वाचावी.)

प्राधान्य

  1. JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
  2. बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
  3. मराठी व इंग्रजी टायपिंग असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 20 वर्ष ते 35 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था (CSIO) भरती 2026| 10 वी/12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र मध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)

  • सर्व प्रवर्गातील- उमेदवारांसाठी – 11,21/- रुपये
  • (अर्ज फी न परतावा आहे Non Refundable)

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि देवळा मर्चेंटस् को-ऑप. बँकच्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्या.
  2. Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज Submit करा
  6. अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 17 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  26 जानेवारी 2026
  3. परीक्षेची दिनांक – 13 फेब्रुवारी 2026
  4. प्रत्यक्ष मुलाखतीची दिनांक – 25 फेब्रुवारी 2026
निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. ऑफलाईन परीक्षा
  2. दस्तावेज पडताळणी
  3. मुलाखत
  4. अंतिम निवड यादी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही दि देवळा मर्चेंटस् को-ऑप. बँकच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

Deola Merchants Cooperative Bank Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
  3. पदवी वी उत्तीर्ण गुणपत्रक
  4. MS-CIT प्रमाणपत्र
  5. आधार कार्ड/पॅन कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • 245 – 15 – 305 – 18 – 377 – 20 – 457 – 25 – 557 – 30 – 677 – 35 – 817 – 40- 977 – 45 – 1067

महत्वाच्या सूचना

  1. या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे.
  2. उमेदवारांनी परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  3. उमेद्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे. तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सुचना, संदेश व माहिती उमेद्वारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमे‌द्वाराची राहिल. तसेच ई-मेल आय.डी. व संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना फेडरेशन व बैंक जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रियेदरम्यान फेडरेशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करुन भरतीप्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमे‌द्वाराची राहील.
  4. उमे‌द्वारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा. उमेद्वारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रके, अन्य प्रमाणपत्रके व पुरावे जोडणे आवश्यक नाही. तथापि घेण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष मुलाखती दरम्यान सर्व प्रमाणपत्र/कागदपत्र यांची सखोल छाननी करण्यात येईल.
  5. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील व याबाबत उमेदवारांना कोठेही व कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यावर बदलता येणार नाही.
  6. उमेदवारांना ऑफलाईन परीक्षा/दस्तावेज पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखचनि उपस्थित रहावे लागेल.
  7. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बँकेमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीनंतर निवड केली जाईल.
  8. उमेदवारांना अर्ज भरतांना अडचणी/शंका असल्यास संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन अडचणी/शंकांचे निरसन करावे.

निष्कर्ष

Deola Merchants Cooperative Bank Bharti 2026-या भरतीमध्ये निवड होवून बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment