Kamgar Ayuktalay Bharti 2026: कामगार आयुक्तालयात गट क पदांची भरती, पगार ₹1.12 लाख

Kamgar Ayuktalay Bharti 2026: कामगार आयुक्तालयात गट क पदांची भरती, पगार ₹1.12 लाखसरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या माझ्या तमाम मित्र/ मैत्री यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.कारण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असणारे कामगार आयुक्तालय मुबई यांच्या वतीने नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येत असून,पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रस्तुत भरतीची जाहिरात ही कामगार आयुक्तालय मुबईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये निरीक्षक,लेखापाल,लघुटंखलेखक हे पदे भरण्यात येणार आहेत.भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील लेखा मध्ये देण्यात आली आहे.मात्र पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf नक्की वाचावी.

सविस्तर तपशील

घटक माहिती
भरती संस्थाकामगार आयुक्तालय
एकूण जागा  78
पदाचे नाव  निरीक्षक,लेखापाल,लघुटंखलेखक
अर्ज सुरू तारीख   13 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची  तारीख 11 जून 2026
अर्ज पद्धत ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा 19 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असावे.
नोकरी ठिकाण  महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळhttps://www.labour.gov.in/

Kamgar Ayuktalay Bharti 2026 या भरतीची विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी पात्र उमेदवारांना मिळाली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  1. निरीक्षक:- या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे अनिवार्य आहे. किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून घोषित केलेली कोणतीही शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.
  2. लेखापाल:- लेखापाल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) असणे गरजेचे आहे. यासोबतच संबंधित उमेदवाराला लेखा क्षेत्रामध्ये (Accounting Field) काम करण्याचा किमान ३ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
  3. लघुटंकलेखक :- या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण केलेली असावी. शैक्षणिक अर्हतेसोबतच उमेदवाराकडे खालीलप्रमाणे टंकलेखन आणि लघुलेखन प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.इंग्रजी व मराठी लघुलेखन (Shorthand) वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मराठी टंकलेखनाचा (Typing) वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे.शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमांनुसार कॉम्प्युटर टायपिंगचा बेसिक कोर्स देखील समकक्ष अर्हता म्हणून ग्राह्य धरला जाईल

वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय 19 वर्षे
  • कमाल वय  45 वर्षे
  • (मागावर्गीय उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट दिली गेलेली आहे)

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • ऑनलाईन परीक्षा (CBT)
  • लघुटंकलेखक पदासाठी लेखी परीक्षेनंतर व्यावसायिक टंकलेखन आणि लघुलेखन चाचणी घेतली जाईल.
  • अंतिम निवड यादी

पगार (Salary)

निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.

पदाचे नाव वेतन
निरीक्षक३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
लेखापाल३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
लघुटंकलेखकरु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

अर्ज फी (Application Fee)

  • अमागास उमेदवारांसाठी:- 1000/- रुपये
  • मागासवगीय/आ.दु.घ. उमेदवारांसाठी:- 900/- रुपये

आवश्यक कागदपत्रे (Required Document)

  • फोटो आणि सही
  • आधारकार्ड
  • 10 वी/12 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
  • लघुटंकलेखक पदासाठी लघुलेखन आणि टायपिंग प्रमाणपत्र
  • जातीचा दाखल (लागू असल्यास)
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा

Kamgar Ayuktalay Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)

  • Kamgar Ayuktalay Bharti 2026 अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • सरळसेवा परीक्षा गट क 2026 यावरती click करा.
  • नवीन उमेदवारांनी New Registration वरती क्लिक करून नोंदणी करून द्या.
  • Login करून आवश्यक माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  • शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • Payment करून अर्ज Submit करा.
  • अर्जाची प्रिंट कॉपी करून ठेवा.

Kamgar Ayuktalay Bharti 2026 Apply Link

अभ्यासक्रम

विषय गुण
मराठी भाषा३०
इंग्रजी भाषा३०
बुध्दिमापन चाचणी३०
सामान्य ज्ञान- इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित३०
अधिनियम-विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ व महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.  ८०
एकूण २००

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध Email id आवश्यक आहे.
  2. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, आणि महाराष्ट्रात 15 वर्षे अधिवास (Domicile) करीत असल्याबाबतचे त्याने सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र (तहसिलदार यांचे कार्यालयाकडील) किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याबाबत जन्म दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
  3. शैक्षणिक अर्हते व्यतिरिक्त सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नेमणूकीसाठी शासन वेळोवेळी आदेश काढुन निश्चित करेल, असे संगणक हाताळणी / वापराबाबतचे ज्ञान (महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इत्यादी), एक अतिरिक्त आवश्यक अर्हता असेल.
  4. उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे.
  5. निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवाराची निवड झाल्यावर किंवा नियक्ती दिल्यानंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात व परीक्षेचे वेळी दिलेली माहिती किंवा कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी निवड नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
  6. पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज अर्ज सादर करण्यापूर्वी Kamgar Ayuktalay Bharti 2026 अधिकृत जाहिरात वाचावी.

निष्कर्ष

Kamgar Ayuktalay Bharti 2026: या भरतीमध्ये निवड होण्या म्हणजे आकर्षक वेतन आणि नोकरीची स्थिरता आहे.तसेच सरकारी नोकरी आहे.त्यामुळे पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज विहित तारखेत ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

हि जाहिरात पण बघा :- RRB ALP Bharti 2026: रेल्वेत 11,127 जागांची मोठी भरती!10वी, ITI, Diploma उमेदवारांना संधी

3 thoughts on “Kamgar Ayuktalay Bharti 2026: कामगार आयुक्तालयात गट क पदांची भरती, पगार ₹1.12 लाख”

Leave a Comment