Thane Municipal Corporation Recruitment 2025: ठाणे महानगरपालिका नेहमी होतकरू उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.त्याच प्रमाणे GNM/ANM उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ठाणे महानगरपालिका अंतर्गत काम करण्याची मोठ्ठी संधी मिळणार आहे.
Thane Mahanagar Palika Bharti 2025- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्याकरिता अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 140 जागा भरण्यात येत असून,त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (गुगल फॉर्म) द्वारे अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.यासाठी 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक असेल.भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| GNM महिला व पुरुष | 77 |
| ANM | 63 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- GNM महिला व पुरुष: BSC Nursing/GNM कोर्स केलेला असावा. MNC नोंदणी अनिवार्य आहे.
- ANM: ANM कोर्स केलेला असावा. MNC नोंदणी अनिवार्य.
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
| प्रवर्ग | वयोमर्यादा |
| खुला प्रवर्ग | 38 वर्ष |
| राखीव प्रवर्ग | 43 वर्ष |
हि पण भरती महत्वाची: भारतीय सीमा सुरक्षा दल भरती 2025|शैक्षणिक पात्रता:10 वी उत्तीर्ण रुपये|आजच आपला अर्ज करा
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिका मध्येब(Thane) काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
| वर्ग | फी(Fee) |
| खुला प्रवर्ग | 750/- रुपये |
| राखीव प्रवर्ग | 500/- रुपये |
- महत्वाचे: अर्ज फी ना परतावा आहे (Non Refundable)
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्म लिंक-https://forms.gle/qPvdKb४PsbBLEqvWe वरती क्लिक करायचे आहे.
- अर्जदाराने सर्व शैक्षणिक/तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादीची माहिती अर्जासोबत स्वसाक्षांकित छायांकित कागदपत्रे जोडावीत,
- शैक्षणिक अर्हतेबाबतचा सविस्तर व अचूक तपशील अर्जात नोंद करावा.
- आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त केली आहे ती तारीख अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. (निकाल घोषीत केल्याचा दिनांक)
- संपूर्ण माहिती भरून आपला अर्ज submit करावा.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 15 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 24 15ऑक्टोबर 2025
- ऑनलाईन अर्ज फी आकारण्याची अंतिम दिनांक- 24 ऑक्टोबर 2025
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- गुणवत्ता यादी (Merit list)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- GNM महिला व पुरुष- 20,000 रुपये
- ANM – 18,000 रुपये
अर्ज सादर करण्याचा पत्ता
- चौथा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका इमारत, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (प.) 400602
Thane Municipal Corporation Recruitment 2025– भरती का खास आहे?
- अनुभव घेण्याची चांगली संधी– आरोग्य क्षेत्रात नोकरी आणि अनुभव मिळविण्याची उत्तम संधी आहे.
- सामाजिक प्रतिष्ठा – आरोग्य विभागमध्ये भरती होणे म्हणजे समाजात प्रतिष्ठा, सन्मान आणि आदर प्राप्त करणे.
महत्वाच्या सूचना
- ही भरती केवळ कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर होत असून,उमेदवारांना केवळ ऑनलाइन (गुगल फॉर्म) पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- या भरतीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणा-या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवारांनी भरणे आवश्यक आहे.
- केंद्र शासनाच्या मंजूरी नुसार कार्यक्रमांतर्गत अथवा अभियान अंतर्गत बदल झाल्यास परिस्थिती अनुरूप पदांची संख्या/आरक्षणात बदल होऊ शकतो,याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्जामध्ये प्रविष्ट केलेली माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
- या भरतीसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या पदस्थापनेबाबतचे व पदभरतीतील सर्व अधिकार मा. आयुक्त, सो. ठाणे महानगरपालिका ठाणे, यांना राहतील.
- अधिक माहितीसाठी मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज करावा.
निष्कर्ष
Thane Municipal Corporation Recruitment 2025– ठाणे महानगरपालिका ठाणे 15 वा वित्त आयोगा अंतर्गत भरती होण्याची ही एक उत्तम संधी उमेदवारांना मिळणार आहे.तसेच भरती मध्ये निवड झाल्यानंतर योग्य वेतन सुद्धा देण्यात येणार आहे.तरी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज विहित मुदतीपूर्वी भरून घ्यायचा आहे.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
ANM