RBI Bharti 2026: 572 जागांसाठी अधिकृत भरती जाहिरात

सरकारी अपडेट

RBI Bharti 2026: 572 जागांसाठी अधिकृत भरती जाहिरात

शेवटची तारीख 04/02/2026
🔴 ही भरती बंद झाली आहे
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 फेब्रुवारी 2026 होती. सध्या अर्ज स्वीकारले जात नाहीत.

RBI Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत 572 पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे नोकरी मिळवण्याची चांगली संधी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मिळणार आहे.प्रस्तुत भरती ही RBI च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे,उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी 4 फेब्रुवारी 2026 हा अंतिम दिनांक आहे.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.परंतु उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव पद संख्या  
कार्यालय परिचर572

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यालय परिचरमान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी( मूळ pdf जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  1. General (सामान्य) – 18 वर्ष ते 25 वर्ष
  2. SC/ST – अधिक 05 वर्ष
  3. OBC – अधिक 03 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  1. SC/ST/दिव्यांग/माजी सैनिक यांच्यासाठी 50/- रुपये +18% GST. (सूचना शुल्क)
  2. OBC/EWS/सर्वसाधारण उमेदवारांसाठी  450/- रुपये + 18% GST (परीक्षा शुल्क + सूचना शुल्क)

अर्ज करण्याची पद्धत

  1. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  https://ibpsreg.ibps.in/rbipodec25/ लिंक वरती क्लिक करा
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.परत login करून आपली वैयक्तिक माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  3. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक दस्तावेज अपलोड करा आणि Payment करून अर्ज Submit करा
  4. अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून ठेवा.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 15 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  04 फेब्रुवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. ऑनलाईन परीक्षा
  2. भाषा चाचणी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF)येथे बघा 
ऑनलाईन अर्जयेथे बघा 
अधिकृत वेबसाइटयेथे बघा 

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही RBI च्या  अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

RBI Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
  3. जातीचा दाखला (लागू लागल्यास)
  4. आधार कार्ड/पॅन कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा 24,250/- रुपये ते 53,550/- रुपये पर्यंत

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने फोटोच्या ठिकाणी फोटो आणि स्वाक्षरीच्या ठिकाणी स्वाक्षरी अपलोड केल्याची खात्री करावी. जर फोटोच्या ठिकाणी फोटो आणि स्वाक्षरीच्या ठिकाणी स्वाक्षरी योग्यरित्या अपलोड केली गेली नाही, तर उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  3. या भरतीसाठी उमेदवार फक्त एकाच कार्यालयातील रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात आणि त्यांना ज्या राज्यात कार्यालय स्थित आहे, त्याच राज्यातील ऑनलाइन परीक्षा केंद्राची निवड करावी लागेल. उदाहरणार्थ, अहमदाबाद कार्यालयात अर्ज करणारा उमेदवार फक्त त्या कार्यालयाच्या (RBI Bharti 2026) अधिकारक्षेत्रातील केंद्राची निवड करू शकतो. एकापेक्षा जास्त नोंदणी झाल्यास, शेवटची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
  4. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना अर्जाची प्रिंटआउट किंवा कोणतीही प्रमाणपत्रे किंवा त्यांच्या प्रती कोणत्याही पत्त्यावर सादर करण्याची आवश्यकता नाही.
  5. अर्जामध्ये घोषित केलेल्या माहितीच्या आधारावरच त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाईल. कोणत्याही टप्प्यावर, ऑनलाइन अर्जामध्ये दिलेली कोणतीही माहिती खोटी/चुकीची आढळल्यास किंवा बँकेच्या मते उमेदवार पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यास,त्यांची उमेदवारी किंवा नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.
  6. सर्व शैक्षणिक पात्रता भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त मंडळे/संस्थांकडून प्राप्त केलेली असावी. गुणांऐवजी ग्रेड दिले असल्यास, उमेदवारांनी त्याचे संख्यात्मक समतुल्य स्पष्टपणे नमूद करावे.
  7. उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहावे लागेल.त्यासाठी प्रवास भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  8. अर्जदारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

RBI Bharti 2026 – भारतसरकरच्या अधिपत्याखाली नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे विहित तारखेत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment