NHM Gadchiroli Bharti 2026: राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 172 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून,आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून Google Form च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| विशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट, स्टाफ नर्स, समुपदेशक, लेखापाल, तालुका गट संयोजक, सांख्यिकी सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ञ, दंत तंत्रज्ञ व इतर पदे (सविस्तर पदे बघण्याकरिता मूळ pdf जाहिरात वाचावी) | 172 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक वेगवेगळी देण्यात आली आहे,त्यासाठी खालील pdf वाचा.
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी कमाल- 38 वर्ष
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी कमाल- 43 वर्ष
हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना गडचिरोली (NHM) मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 150/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील google फॉर्म ओपेन करा.
- New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
- Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Payment करून अर्ज Submit करा
- ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात – 09 जानेवारी 2026
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 20 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- मुलखात
- दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही NHM Gadchiroli Bharti 2026 च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा 17,000/- रुपये ते 1,25000/- रुपये पर्यंत
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरती ही अधिकृत संकेतस्थळावरती (NHM)जाहीर करण्यात आली असून उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर आणि वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
- या भरतीमधील पदे ही केवळ कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येत.तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 26/06/2026 पर्यंत नेमणूक दिली जाईल याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी Google Form link च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर ईमेल वरती Auto Generated अर्जाची प्रत प्राप्त होईल.सदर या अर्जाची प्रत उमेदवारांनी संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत स्वतःकडे जपून ठेवावी.तसेच मूळ दस्तावेज पडताळणी वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
- अर्ज सादर करतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- उमेदवार जर एकापेक्षा अधिक पदांसाठी पात्र असेल तर,प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा.तसेच स्वतंत्र चलन भरणे बंधनकारक राहील.
- भरती प्रक्रियाच्या वेळी उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल ,त्यासाठी TA दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- भरती प्रक्रिया संदर्भात अधिक नियम(NHM Gadchiroli 2026) आणि अटी भरती विभाग राखून ठेवते
- पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी अशी विनंती करण्यात येते.
निष्कर्ष
NHM Gadchiroli Bharti 2026- आरोग्य विभागात चांगल्या वेतनाची नोकरी आणि अनुभव मिळविण्याची पात्र आणि इच्छुक उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे अधिकृत तारखेनुसार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा