MSRTC Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्रातील शहरं आणि गावांना जोडण्यासाठी आणि महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी बस सेवा पुरवते. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
MSRTC Bharti 2025- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागा अंतर्गत समुपदेशक या पदासाठी कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर जाहिरात प्रकाशित केली आहे.पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी 20 ऑक्टोबर 2025 ही अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| समुपदेशक | नमूद नाही |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- समुपदेशक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची समाजकार्य (M.S.W) या विषयामध्ये पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची/ संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.(M.A Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा (Age Limit)
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा नमूद करण्यात आलेली नाही.
हि पण भरती महत्वाची: वनविभाग भरती 2025|मासिक वेतन: 50,000 रुपये|सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना अकोला,आणि वाशीम जिल्हा अंतर्गत काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी आकारली जाणार नाही,त्यामुळं जनसामान्य उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची पद्धत
- या भरतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचे फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखीत करून स्वतःचा फोटो त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला शेक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा.
- सदर अर्ज आपण विभाग नियंत्रक रा.प. अकोला यांचेकडे दिनांक 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावा.
- या भरती बाबत अधिक माहितीसाठी विभाग नियंत्रक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 08 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 20 ऑक्टोबर 2025
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- शैक्षणीक पात्रता (Education Qualification)
- समुपदेशनाचा अनुभव (Experience of Councelling)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
वेतनश्रेणी
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- मासिक मानधन 4000/- रुपये पर्यंत देण्यात येईल.
MSRTC Recruitment 2025– भरतीचे वैशिष्ट्य काय आहे?
- समुपदेशन क्षेत्रात अनुभव– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे मानसिक ताण तणाव निवारण करणे आणि वैयक्तिक संवाद साधून अडचणी समजून घेणे हे कर्तव्य असल्यामुळे या भरतीचा अनुभव अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
- करिअर वाढीची संधी – लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे,आणि काम करत,असल्यामुळे भविष्यात तुमचे करिअर वाढीची ही संधी आहे.
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी केलेला अर्ज अपूर्ण असेल तर अपात्र ठरविण्यात येतील याची नोंद घ्यावी.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.
- अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी संपर्क साधला जाईल.
- सदर नियुक्ती मानद तत्वावर असल्याने रा.प. महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे/सामावून घेण्याचे वा नियमीत सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे हक्क अर्जदारास/समुपदेशकास नसतील.
- सक्षम नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
अधिक माहितीसाठी
- रा. प अकोला विभाग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याच्याशी संपर्क साधावा.
निष्कर्ष
MSRTC Recruitment 2025 ही भरती समाजसेवेमध्ये आपले करिअर करू अशी इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे,कारण लोकांशी प्रत्यक्ष संवाद आणि भेट या मधून खूप मोठी शिकवण आणि अनुभव मिळणार आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अकोला आणि वाशीम अशा दोन जिल्ह्यात जाता येणार आहे. म्हणून पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत करायचा आहे.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
Only wanna comment on few general things, The website design is perfect, the articles is real excellent : D.