Mahila Balvikas Vibhag Bharti 2025: पुणे येथे संरक्षण अधिकारी पदांसाठी भरती जाहीर

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे कारण,महिला व बालविकास विभाग पुणे अंतर्गत संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 17 जागा असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट क 17

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट क
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • उमेदवारांना संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • General (सामान्य) 38 वर्ष
  • SC/ST अधिक 05 वर्ष
  • OBC अधिक 03 वर्ष

हि पण भरती महत्वाची: 📢 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी|एकुण जागा:025,487| आजच अर्ज करा

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना पुणे याठिकाणी काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  • खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 1000/- रुपये
  • मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 900/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  • प्रस्तुत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  • Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  • Login करून संपूर्ण माहिती भरून घ्या आणि शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • Payment करून अर्ज Submit करा व अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  08 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 22 डिसेंबर 2025

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • लेखी परीक्षा (Written exam)
  • दस्तावेज पडताळणी (Document Verification)
  • मुलखात (Interview)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • वयाचा पुरावा (10 गुणपत्रक)
  • पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  • डोमासेल प्रमाणपत्र/आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये पर्यंत

महत्वाच्या सूचना

  • प्रस्तुत भरतीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  • या भरतीसाठी उमेदवाराने जाणीवपूर्वक अथवा हेतूपुरस्पर चुकीची खोटी माहिती अथवा चूकीचे कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर केल्यास अथवा खरी माहिती लपवली आहे/गैरप्रकाराव्दारे नियुक्ती मिळवली आहे असे भरती प्रक्रियेच्या शासकीय सेवेच्या कोणत्याही टप्यावर निदर्शनास आल्यास संबधित उमेदवाराची झालेली निवड शासकीय सेवा रद्द करण्याचे अधिकार आयुक्त, महिला व बाल(WCD Pune Recruitment 2025)
  • विकास, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवले आहेत.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भरती प्रक्रियेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास असे उमेदवार भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरण्यास पात्र राहतील.
  • उमेदवारास लेखी परीक्षेची संधी ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या पात्रतेनुसार/ माहितीनुसार देण्यात येत आहे.
  • परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. निवड यादीत समावेश करण्यात आलेल्या उमेदवारांची सदर सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीबाबत सर्व मूळ कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. कागदपत्र पडताळणीच्या वेळी सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अटी व शती नुसार/ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार विहीत कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या शासकीय सेवेच्या कोणत्याही टप्यावर अपात्र ठरविण्याचे/निवड रद्य करण्याचे/नियुक्ती रदद करण्याचे संपुर्ण अधिकार आयुक्त, (Mahila Balvikas Vibhag Bharti 2025)महिला व बाल विकास, पुणे यांनी राखुन ठेवले आहेत.
  • भरती संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

निष्कर्ष

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025- शासकीय क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.त्यामुळे पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता शेवटच्या तारखेच्या आधी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment