Gondwana University Bharti 2026|गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

सरकारी अपडेट

Gondwana University Bharti 2026|गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

शेवटची तारीख 23/01/2026
🔴 ही भरती बंद झाली आहे
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2026 होती. सध्या अर्ज स्वीकारले जात नाहीत.

Gondwana University Bharti 2026: गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून,नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.प्रस्तुत भरती ही गोंडवाना (Gondwana University) विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि भरती संदर्भातील नियम व अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव पद संख्या 
संचालक – परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ01

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संचालक – परीक्षा आणि मूल्यांकन मंडळकोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी आणि किमान 55% गुणांसह किंवा यू.जी.सी.च्या 7-गुण प्रणालीनुसार ‘बी’ श्रेणीच्या समकक्ष असावे.

वयोमर्यादा (Age Limit) 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान – 45 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना गोंडवाना विद्यापीठात काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  • अर्ज फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

  1. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी नमुना अर्ज खाली देण्यात आला आहे.
  2. अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 25 डिसेंबर 2025
  2. अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. लेखी परीक्षा
  2. प्रत्यक्ष मुलखात

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF)येथे बघा 
नमुना अर्जयेथे बघा 
अधिकृत वेबसाइटयेथे बघा 

Gondwana University Bharti 2026

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • रजिस्ट्रार, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम. आय. डी. सी. रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली जिल्हा गडचिरोली पिन 442605 (एमएस), भारत.

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रक
  3. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • शासकीय नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे.

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  2. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. अर्ज हा विद्यापीठाच्या वेबसाइटवर (https://unigug.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील अर्जाच्या स्वरूपातच भरावा.
  4. उमेदवारांनी हे सुनिश्चित करावे की अर्जामधील कोणताही स्तंभ चुकीचा भरला जाणार नाही, कारण त्यामध्ये दिलेल्या माहितीचा उपयोग उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्याकरिता त्यांची पात्रता आणि योग्यता ठरवण्यासाठी केला जाईल. जे अर्ज योग्यरित्या भरलेले नाहीत, अपूर्ण आहेत किंवा सूचनांनुसार नाहीत, असे अर्ज रद्द केले जाऊ शकतात आणि अशा नकाराची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची स्वतःची असेल.
  5. साध्या कागदावर केलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. तसेच, ई-मेल आणि फॅक्सद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  6. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या समर्थनार्थ आवश्यक तेथे प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती जोडाव्यात आणि जोडलेल्या कागदपत्रांचा अनुक्रमांक अर्जात दिलेल्या संबंधित स्तंभात नमूद करावा. जोडलेल्या प्रमाणपत्रांमध्ये असलेली कोणतीही माहिती, जोपर्यंत तिचा अर्जामध्ये दावा केला जात नाही, तोपर्यंत विचारात घेतली जाणार नाही.
  7. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

Gondwana University Bharti 2026– विद्यापीठामध्ये नोकरी मिळवण्याची स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्वाची ठरू शकते.त्यामुळे विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment