Latur DCC Bank Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? तर मग ही जाहिरात तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे कारण, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत एकूण 375 पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती ही लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून, त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम आणि अटी खालील लेखामध्ये सविस्तर देण्यात आले आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| लिपिक | 250 |
| उपश्रेणी (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी) | 115 |
| चालक | 10 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर असावे, MSCIT उत्तीर्ण केलेली असावी. |
| उपश्रेणी (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी) | उमेदवाराने किमान 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. |
| चालक | उमेदवाराने किमान 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. (अधिकृत जाहिरात pdf वाचा) |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- लिपिक: किमान 21 वर्षे ते कमाल 30 वर्षे
- उपश्रेणी (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी): किमान 19 वर्षे ते कमाल 28 वर्षे
- चालक: किमान 19 वर्षे ते कमाल 28 वर्षे
हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- सर्व प्रवर्ग उमेदवारांसाठी – 900/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
- Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची हार्ड कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात – 18 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 21 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- ऑनलाईन परीक्षा
- मुलखात
- दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
Latur DCC Bank Bharti 2026
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- ड्रायव्हिंग लायसन्स
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- डोमसेल प्रमाणपत्र
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे.(Pdf जाहिरात वाचावी)
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी ज्या उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती, परिक्षा शुल्क, मुळ कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल, अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांकरीता करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेली संपूर्ण अर्हता, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती व मुळ कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास, उमेदवाराची निवड कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
- उमेदवाराची संगणकाद्वारे ऑनलाईन परिक्षा लातूर जिल्ह्यातील केंद्रावर व इतरही जिल्ह्यातील केंद्रावरही परिक्षा घेतली जाईल. (उमेदवारास जिल्ह्यातीलच केंद्रावर परिक्षा घेण्यात यावी, असा हक्क सांगता येणार नाही.)
- पात्रतेबाबतच्या खोट्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (डोमिसाईल प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक) अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्क आहे.
- लिपीक उमेदवारास मराठी व इंग्रजी तसेच सबग्रेड / वाहनचालक उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन परिक्षेस / कागदपत्र पडताळणीस मौखिक मुलाखतीस बोलविलेल्या उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल याची नोंद घ्यावी.
- पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी अशी विनंती केली जाते.
निष्कर्ष
Latur DCC Bank Bharti 2026– बँकिंग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्जाची नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, अर्हता धारक उमेदवारांनी आपला अर्ज विहित तारखेत सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा