Indian Post GDS Recruitment 2026|भारतीय पोस्ट विभाग (GDS) अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

Indian Post GDS Recruitment 2026: 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे कारण,भारतीय पोस्ट विभाग (GDS) अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.प्रस्तुत भरती ही भारतीय पोस्ट (Indian Post GDS )विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून,या भरतीमध्ये एकूण 28,740 जागा भरण्यात येत आहेत.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
BPM 28,740
ABPM
Dak Sevak

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
BPM उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.(मूळ pdf जाहिरात वाचा)
ABPM
Dak Sevak

इतर पात्रता

  1. संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे
  2. सायकल चालवण्याचे ज्ञान असायला हवे.
  3. उपजीविकेचे पुरेसे साधन.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  1. General उमेदवारांसाठी – 10 वर्ष ते 40वर्ष
  2. SC/ST उमेदवारांसाठी – अधिक 05 वर्ष
  3. OBC उमेदवारांसाठी – अधिक 03 वर्ष
  4. PwBD उमेदवारांसाठी – अधिक 10 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था (CSIO) भरती 2026| 10 वी/12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  1. General/OBC/EWS उमेदवारांसाठी – 100/- रुपये
  2. SC/ST/PwBD/Female उमेदवारांसाठी – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/ च्या वेबसाइट वर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज Submit करा
  6. अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 31 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  16 फेब्रुवारी 2026
  3. अर्ज दुरुस्ती – 18 ते 19 फेब्रुवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. दहावीची टक्केवारी
  2. दस्तावेज पडताळणी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही India Post GDS च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

Indian Post GDS Recruitment 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
  3. जातीचा दाखला (लागू असल्यास)
  4. आधार कार्ड/पॅन कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा बेसिक – 10,000/- रुपये ते 29,380/- रुपये पर्यंत

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.
  2. कोणत्याही कारणामुळे अर्जदारांना ईमेल/एसएमएस न मिळाल्यास (GDS) विभाग जबाबदार राहणार नाही, आणि म्हणून उमेदवारांना नवीनतम अद्यतनांसाठी नियमितपणे ऑनलाइन नियुक्ती पोर्टलला भेट देत राहण्याचा सल्ला दिला जातो.
  3. ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनंतर, त्यामध्ये बदल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही दुरुस्ती विंडो प्रदान करण्याचा उद्देश मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी वगळता नावे आणि इतर डेटा/गुण/पसंती क्रम इत्यादी दुरुस्त करणे आहे. या दोन दिवसांच्या मुदतीत, जर बदलांमध्ये शुल्क भरण्याची आवश्यकता असलेल्या श्रेणीमध्ये कोणताही बदल समाविष्ट असेल, तर असे बदल केवळ तेव्हाच स्वीकारले जातील/अनुमती दिली जाईल जेव्हा उमेदवार विहित (Indian Post GDS Recruitment 2026) प्रक्रियेनुसार शुल्क जमा करेल. बदल केल्यानंतर, ऑनलाइन अर्जातील पूर्वीचे तपशील रद्द मानले जातील आणि सुधारित अर्जात नमूद केलेल्या तपशिलांवर आधारित गुणवत्ता निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी.
  4. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

Indian Post GDS Recruitment 2026 – ही 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि सुवर्णसंधी आहे. स्थिर नोकरी, केंद्र सरकारअंतर्गत सेवा, चांगले वेतन आणि संपूर्ण भारतात काम करण्याची संधी यामुळे ही भरती विशेष महत्त्वाची ठरते.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

1 thought on “Indian Post GDS Recruitment 2026|भारतीय पोस्ट विभाग (GDS) अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित”

Leave a Comment