NPCIL Bharti 2026: नमस्कार मित्रांनो नोकरी शोधताय? तर मग मी पोस्ट तुमच्या साठी महत्वपूर्ण ठरणार आहे.कारण भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या ‘न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी पात्र उमेदवारांना मिळणार आहे.
प्रस्तुत भरतीमध्ये एकुण 255 पदे भरण्यात येणार असून,पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यासाठी 29 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.मात्र पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
सविस्तर तपशील
| घटक | माहिती |
| भरती संस्था | NPCIL |
| एकूण जागा | 255 |
| पदाचे नाव | विविध रिक्त पदे |
| अर्ज सुरू तारीख | 08 जून 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29 जून 2026 |
| शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| वयोमर्यादा | 18 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असावे. |
| नोकरी ठिकाण | कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्रोजेक्ट (KKNPP) |
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx |
NPCIL Bharti 2026 अणुऊर्जा क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्याची आणि देशसेवेसाठी योगदान देण्याची ही उत्तम संधी पात्रता धारक उमदेवारांना आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- प्लांट ऑपरेटर पदासाठी:या पदासाठी उमेदवाराने किमान 50% गुणांसह विज्ञान शाखेतून (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह) 12 वी (HSC) किंवा ISC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, इयत्ता 10 वीच्या पातळीवर इंग्रजी हा एक विषय म्हणून अभ्यासलेला असणे आवश्यक आहे.
- इतर सर्व ट्रेड्ससाठी (ITI पदांसाठी):उमेदवाराने 10 वी (SSC) परीक्षेत विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये स्वतंत्रपणे किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण केलेले असावे. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये (उदा. फिटर, इलेक्ट्रिशियन इ.) 2 वर्षांचे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- (शैक्षणिक पात्रते बद्दल अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचावी)
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय 18 वर्षे
- कमाल वय 24 वर्षे
- (मागावर्गीय उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट दिली गेलेली आहे)
शारीरिक पात्रता (Physical Standards)
- किमान उंची: 160 सेमी
- किमान वजनः 45.5 किलो
निवड प्रक्रिया (Selection Process)
- प्रारंभिक परीक्षा
- मुख्य परीक्षा
- कागदपत्र पडताळणी
पगार (Salary)
निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
- दरमहा 21,700/- रुपये ते 34,420/- रुपये सुरवातीला दिला जाईल.सोबत DA आणि वैद्यकीय सुविधा लागू असतील.
अधिक सुविधा
वर नमूद केलेल्या मानधनाव्यतिरिक्त, सध्याच्या नियमांनुसार, नियुक्तीचे ठिकाण आणि पात्रतेवर अवलंबून खालील भत्ते, प्रोत्साहन आणि सुविधा देखील उपलब्ध आहेत
भत्ते
- वाहतूक भत्ता
- घरभाडे भत्ता / निवास व्यवस्था
- कार्यस्थळ भत्ता (Site Location Allowance)
- व्यावसायिक अद्ययावत भत्ता (वार्षिक)
कर्मचारी लाभ आणि इतर सुविधा
- रजा प्रवास भत्ता (LTA)
- रजा आणि रजेचे रोखीकरण (Leave Encashment)
- स्वतःसाठी आणि अवलंबितांसाठी वैद्यकीय सुविधा (CHSS)
- टाउनशिपच्या (वसाहतीच्या) आत मुलांसाठी शैक्षणिक सुविधा
- मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य
- व्यावसायिक संस्थांच्या सदस्यत्व शुल्काची प्रतिपूर्ती
- केबल टीव्ही शुल्काची प्रतिपूर्ती
- मोबाईल फोन शुल्काची प्रतिपूर्ती
- वर्तमानपत्र शुल्काची प्रतिपूर्ती
- उपहारगृह अनुदान (Canteen Subsidy)
अर्ज फी (Application Fee)
- अमागास उमेदवारांसाठी:- 1000/- रुपये
- मागासवगीय/आ.दु.घ. उमेदवारांसाठी:- फी नाही
आवश्यक कागदपत्रे (Required Document)
- फोटो आणि सही
- आधारकार्ड
- 10 वी/12 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- ITI प्रमाणपत्र
- जातीचा दाखल (लागू असल्यास)
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा
NPCIL Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)
- NPCIL च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
- Apply Online वरती क्लिक करून New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून द्या.
- Login करून संपूर्ण माहिती भरून घ्या.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- Payment करून अर्ज Submit करा (लागू असल्यास)
- अर्जाची प्रिंट कॉपी करून ठेवा.
महत्वाच्या सूचना
- सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध Email id आवश्यक आहे.
- या भरतीसाठी केवळ 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत.
- ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी, उमेदवाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या पदासाठी नमूद केलेले सर्व आवश्यक पात्रता निकष आपण पूर्ण करतो आहोत ना, याची खात्री करणे अनिवार्य आहे.
- जर उमेदवार पात्र नसल्याचे आढळले, तर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल. जर उमेदवार निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झाला, परंतु त्यानंतर तो पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचे निष्पन्न झाले, तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल; आणि जर त्याची नियुक्ती झाली असेल, तर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा नुकसानभरपाईशिवाय त्याची सेवा समाप्त केली जाईल.
- जर एखादा अर्जदार एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असेल आणि त्याला एकाधिक पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल, तर त्याने प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र अर्ज शुल्क सादर करणे आवश्यक आहे. तथापि, जर एकाधिक पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा एकाच सत्रात आयोजित केली गेली असेल, तर उमेदवार आपल्या पसंतीच्या कोणत्याही एका पदासाठी/शाखेसाठी ऑनलाईन परीक्षेला बसू शकतो. अशा परिस्थितीत, उर्वरित अर्जांचा (असल्यास) पुढील भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही आणि अर्ज शुल्क परत केले जाणार नाही.
- एखाद्या उमेदवाराने एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक/दुबार अर्ज सादर केले असल्यास, केवळ सर्वात अलीकडील अर्जाचाच विचार केला जाईल.
निष्कर्ष
NPCIL Bharti 2026 ही ITI आणि 12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
हि जाहिरात पण बघा: Bank of Baroda Bharti 2026: 5000 Apprentice पदांची भरती, 15,000 पगार, लगेच करा अर्ज
1 thought on “NPCIL Bharti 2026: 255 जागांसाठी भरती सुरू! ITI आणि 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी”