ICMR Bharti 2026: नमस्कार मित्रांनो सरकारी विभागात नोकरी शोधतात का? तर मग मी जाहिरात तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.कारण ICMR (Indian Council Of Medical Research) अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये project Technical Support III हे पद भरण्यात येत असून त्यासाठी, संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये एकुण 01 जागा असून,त्यासाठी 36,400 रुपये प्रतिमहिना पगार आणि प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.सदर भरतीसाठी उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.त्यामुळे एक चांगली संधी उमेदवारांना मिळाली आहे.भारतीसंदर्भात अधिक माहिती खालील देण्यात आहे.
| घटक | माहिती |
| भरती संस्था | Indian Council Of Medical Research |
| प्रोजेक्ट नाव | EQUIP HWC Project in Primpri Chinchwad Municipal Corporation, Pune |
| एकूण जागा | 01 |
| पदाचे नाव | Project Technical Support III |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| शैक्षणिक पात्रता | संबंधित विषयात पदवी |
| वयोमर्यादा | कमाल 35 वर्षे |
| निवड कालावधी | 12/02/2027 पर्यंत |
| नोकरी ठिकाण | पिंपरी चिंचवड (PCMC) |
| जाहिरात pdf | https://drive.google.com/file/d/1ZG7OpMxoWj63sJ_hDzCX9EAs1rfdmAJR/view?usp=drivesdk |
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.icmr.gov.in/ |
प्रस्तुत भरतीमध्ये (ICMR Bharti 2026)विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही,केवळ मुलाखतीद्वारे आपली निवड करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- मानवशास्त्र / समाजशास्त्र / समाजकार्य / मानसशास्त्र या विषयांत तीन वर्षांची पदवी, अधिक तीन वर्षांचा अनुभव; किंवा सार्वजनिक आरोग्य / लोकसंख्या अभ्यास / समाजकार्य / लोकसंख्याशास्त्र / मानवशास्त्र या विषयांत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
इतर पात्रता
- समुदायामध्ये आणि सार्वजनिक आरोग्य प्रणालींसोबत काम करण्याचा क्षेत्रीय अनुभव; तसेच संशोधन कार्याचा अनुभव.गुणात्मक आणि संख्यात्मक (संशोधन) अनुभव; संगणक, Excel, डेटा विश्लेषण आणि SPSS सॉफ्टवेअरचे ज्ञान असायला हवे.
वयोमर्यादा (Age Limit)
- उमेदवारांचे वय कमाल 35 वर्षे
निवड प्रक्रिया (Selection Process)
- शॉर्टलिस्टिंग
- मुलाखत
पगार (Salary)
निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
- दरमहा 36,400 रुपये आणि प्रवास भत्ता लागू असेल.
अर्ज फी (Application Fee)
- प्रस्तुत भरतीसाठी अर्ज फी नाही.
आवश्यक कागदपत्रे (Required Document)
- फोटो आणि सही
- आधारकार्ड
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा
अर्ज कसा करावा (How to Apply)
- खाली दिलेल्या link वरती क्लिक करा
- Registration वरती क्लिक करा आणि Registration करून घ्या.
- Login करा आणि संपूर्ण माहिती भरून घ्या.
- अर्ज Submit करा आणि अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
ICMR काय आहे ?
- Indian Council of Medical Research (ICMR) म्हणजे भारत सरकारची वैद्यकीय संशोधनासाठीची सर्वोच्च संस्था. ही संस्था भारतातील आरोग्य, रोग, औषधोपचार, लसी, सार्वजनिक आरोग्य धोरणे आणि जैववैद्यकीय संशोधन यावर काम करते.
- ही संस्था Ministry of Health and Family Welfare अंतर्गत कार्य करते.
मुलाखतीसाठी महत्वाचे मुद्दे ?
- नागरी आरोग्य वर्धीनी केंद्रात पुरविल्या जाणाऱ्या 13 सेवा काय आहेत याची माहिती असायला हवी.
- घर भेटी तसेच Survey कसा केला जातो.
- Excel मध्ये डाटा कसा टाकला जातो
- SPSS सॉफ्टवेअर कशा साथी आणि कसे वापरले जाते याचे ज्ञान आवश्यक पाहिजे.
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत (ICMR Bharti 2026) भरती ही कायमस्वरूपी नोकरी नसून 12/02/2027 पर्यंत निवड असेल याची नोंद घावी.
- निवड झालेल्या उमदेवारांना पिंपरी चिंचवड शहरात काम करावे लागेल.तसेच पिंपरी चिंचवड अंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य वर्धीनी केंद्रात आपली पोस्टिंग केली जाईल.
- निवड कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यापदावरती कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी.
- आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर वाचावी.
निष्कर्ष
ICMR Bharti 2026 :-Indian Council of Medical Research अंतर्गत प्रसिद्ध झालेली ही भरती सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नसून केवळ मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
हि जाहिरात पण बघा :- Indian Navy Bharti 2026!उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी
1 thought on “ICMR Bharti 2026! पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी”