Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2026 महापारेषण कोलाहापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी अधिकृत जाहितात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे ज्या उमेदवारांचे ITI झाले आहे त्यांच्या साठी हि जाहिरात अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.कारण सरकारी विभागामध्ये काम करण्याचा अनुभव या भरती मध्ये मिळणार आहे. सदर भरतीची जाहिरात हि महापारेषण कोल्हापूर च्या अधिकृत संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये वीजतंत्री या ट्रेडसाठी एकूण ३७ रिक्त पदे भरल्या जाणार आहेत.
यामध्ये विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांना या प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.सदर भरतीसाठी उमेदवारांना online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.भरती संदर्भात अधिक माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली असून,पात्रता धारक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी
| घटक | माहिती |
| विभाग | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), कोल्हापूर |
| पदाचे नाव | शिकाऊ उमेदवार – वीजतंत्री |
| एकूण जागा | ३७ पदे |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
| आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक | E04262700196 |
| अर्ज सुरू तारीख | ०५ मे २०२६ |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | २५ मे २०२६ |
| अधिकृत संकेस्थळ | https://www.mahatransco.in/ |
आपल्या जिल्ह्यातच काम मिळविण्याची हि एक उत्तम संधी ITI उतीर्ण उमेदवारांना मिळणार आहे.त्यामुळे विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- उमेदवारांनी १० वी उत्तीर्ण केलेली असावी
- उमेदवारांकडे NCTVT मान्यताप्राप्त संस्थेतून वीजतंत्री या ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा ( Age Limit)
- उमेदवारांचे वय १८ वर्षे ते ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.(मगासवर्गीय उमेदवारांना 05 वर्ष सूट देण्यात आली आहे.)
निवड प्रक्रिया (Selection Process)
- पात्र उमेदवारांना संपर्क करण्यात येणार आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचावी.)
पगार (Salary)
- शासनाच्या नियमानुसार लागू असेल.(मूळ जाहिरात बघा)
Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम Apprenticeship च्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- जर तुमची आधीच नोंदणी नसेल, तर ‘Candidate Register’ वर क्लिक करून प्रोफाईल १००% पूर्ण करा.
- ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी स्थापना नोंदणी क्रमांक E04262700196 या वापरावा.
अर्ज फी (Application Fee)
- प्रस्तुत जाहिरातीमध्ये अर्ज फी याचा उलेख करण्यात आलेला नाही.
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
- दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र/गुणपत्र
- आय.टी.आय उत्तीर्ण प्रमाणपत्र/गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्र अधिवास)
- आधार कार्ड
- फोटो आणि सही
Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2026 2026 Apply Online Link
महत्त्वाच्या सूचना
- सदर भरतीसाठी पात्रता धारक उमदेवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत,त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध email id आवश्यक आहे.
- मोबाईल नंबर चालू नसेल आणि संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्यासाठी पूर्ण जबदारी उमदेवारांची राहील याची नोंद घ्यावी .
- ऑनलाईन अर्ज सादर करत असताना अचूक माहिती प्रविष्ट करावी,कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- शिकाऊ उमेदवारांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यामुळे कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याची कोणताही अधिकार प्राप्त होत नाही.
- निवड केलेल्या शिकाऊ उमेदवारांनी रुजू होताना जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर यांच्याकडून वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचा दाखला देणे बंधनकारक आहे.
- कागपत्र तपासणी साठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवाना कोणत्याही प्रकारे प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- आपला अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी,
निष्कर्ष
Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2026 महापारेषण कोल्हापूर अंतर्गत निघालेली शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती आयटीआय (ITI) उत्तीर्ण तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीचे मुख्य म्हणजे ज्यांनी ITI (Electrician) पूर्ण केले आहे, त्यांच्यासाठी सरकारी क्षेत्रात कामाचा अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. तसेच या प्रशिक्षणामुळे भविष्यात महावितरण किंवा महापारेषणमध्ये निघणाऱ्या कायमस्वरूपी भरतीसाठी उमेदवारांना प्राधान्य किंवा अनुभवाचा फायदा मिळू शकतो.त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता त्वरित अर्ज करणे हिताचे ठरेल.
हि जाहिरात पण बघा : TDC Maharashtra Watchman Bharti 2026: 416 Group D पदांसाठी भरती सुरू, ऑनलाइन अर्ज करा
1 thought on “Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2026 कोल्हापूरमध्ये ३७ जागांसाठी भरती सुरू, ITI उमेदवारांसाठी मोठी संधी!”