CSIO Recruitment 2026: 10वी/12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी | पगार 56,900

सरकारी अपडेट

CSIO Recruitment 2026: 10वी/12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी | पगार 56,900

शेवटची तारीख 09/02/2026
🔴 ही भरती बंद झाली आहे
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 फेब्रुवारी 2026 होती. सध्या अर्ज स्वीकारले जात नाहीत.

CSIO Recruitment 2026: 10 वी/12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी कारण,केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था (CSIO) अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती ही CSIO च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून,इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना 18,000/– रुपये ते 56,900/- रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव पद संख्या 
Multi-Tasking Staff07

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Multi-Tasking Staffमान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी/12 वी उत्तीर्ण केलेली असावी(अधिक माहितीसाठी मूळ pdf जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 18 वर्ष ते 25 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत (All India)मध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  1. General/OBC/EWS उमेदवारांसाठी – 590/- रुपये
  2. SC/ST उमेदवारांसाठी – अर्ज फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CSIO अधिकृत वेबसाइट वर भेट द्या.
  2. Click here to Apply वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 09 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  09 फेब्रुवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. अर्जांची छाननी (Screening)
  2. ट्रेड टेस्ट (Trade Test)
  3. लेखी परीक्षा (Written Test)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF)येथे बघा 
ऑनलाईन अर्जयेथे बघा 
अधिकृत वेबसाइटयेथे बघा 

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही CSIO च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

CSIO Recruitment 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
  3. 10 वी/12 वी उत्तीर्ण गुणपत्रक
  4. आधार कार्ड/पॅन कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  1. दरमहा 18,000/– रुपये ते 56,900/- रुपये
  2. अधिक महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA),वाहतूक भत्ता (TA) लागू आहे.

महत्वाच्या सूचना

  1. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील मूळ जाहिरात pdf सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वैध ई-मेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर अनिवार्य आहे.
  3. अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  4. विहित केलेली आवश्यक पात्रता ही किमान आहे, आणि केवळ ती पात्रता असल्यामुळे उमेदवारांना ट्रेड टेस्ट/लेखी परीक्षा इत्यादीसाठी बोलावले जाईलच असे नाही. योग्यरित्या गठित केलेली छाननी समिती ट्रेड टेस्ट(CSIO) दरम्यान उमेदवारांची निवड करण्यासाठी स्वतःचे निकष अवलंबू शकते. त्यामुळे, उमेदवाराने अर्ज फॉर्ममध्ये 10वी इयत्तेपासून पुढे किमान विहित पात्रतेव्यतिरिक्त संबंधित क्षेत्रातील सर्व पात्रता आणि अनुभव नमूद करावा.
  5. अर्जदाराने सूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतरच, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यांसारखी सर्व संबंधित माहिती, स्कॅन केलेल्या छायाचित्रासह, केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज फॉर्ममध्ये भरून पूर्ण करावा.
  6. विहित पात्रता मान्यताप्राप्त मंडळे/विद्यापीठे/संस्था इत्यादींकडून प्राप्त केलेली असावी. अपूर्ण अर्ज तात्काळ नाकारले जातील आणि कोणतीही चौकशी स्वीकारली जाणार नाही. अर्जदाराने ऑनलाइन अर्ज सादर करताना अर्ज फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  7. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  8. या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी परिवीक्षाधीन ठेवले जाईल. कार्यक्षमतेनुसार,सक्षम प्राधिकरणाच्या विवेकबुद्धीनुसार परिवीक्षा कालावधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. परिवीक्षा कालावधी पूर्ण केल्यानंतर, प्रचलित नियमांनुसार त्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीसाठी विचार केला जाईल याची नोंद घ्यावी.

निष्कर्ष

CSIO Recruitment 2026CSIO ही CSIR अंतर्गत येणारी एक नामांकित संशोधन संस्था आहे. आहे.या भरतीद्वारे निवड होणे म्हणजे योग्य वेतन मिळविण्याची उत्तम संधी आणि भविष्यात उच्च पदावरती जाण्यासाठी मदत होय. म्हणून पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

6 thoughts on “CSIO Recruitment 2026: 10वी/12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी | पगार 56,900”

Leave a Comment