Palus Sahkari Bank Bharti 2026: पलूस सहकारी बँकेत 19 लिपीक पदांची भरती | Online अर्ज सुरू

Palus Sahkari Bank Bharti 2026: पलूस सहकारी बँक अंतर्गत लिपीक पदासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून,पदवीधर उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सदर भरतीमध्ये एकूण 19 पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
लिपीक 19

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
लिपीक
  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  2. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  3. मराठी,हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

प्राधान्य

  1. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांस प्राधान्य देण्यात येणार आहे.
  2. कोणत्याही सहकारी बँकींग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणा-यांस प्राधान्य आहे.
  3. JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM,IIBF, VAMNICOM इ) बँकींग / सहकार कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 22 वर्ष ते 35 वर्षे

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना सांगली मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 708/- रुपये (GST)

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पलूस सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.परत login करून आपली वैयक्तिक माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  3. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक दस्तावेज अपलोड करा आणि Payment करून अर्ज Submit करा
  4. अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून ठेवा.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 13 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  23 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. लेखी परीक्षा
  2. मुलखात
  3. दस्तावेज पडताळणी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही पलूस सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

Palus Sahkari Bank Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
  3. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  4. आधार कार्ड/पॅन कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • सुरवातीस दरमहा – 9000/- रुपये

महत्वाच्या सूचना

  1. ही भरती पलूस सहकारी बँकेच्या (Palus Sahkari Bank Bharti 2026) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत,त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  2. उमेदवारांनी एकदा भरलेले ऑनलाईन अर्जामध्ये कोणत्याही बद्दल करत येणार नाही याची नोंद घ्यावी.
  3. अर्जामध्ये अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल तसेच कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.
  4. उमेदवारांना परिक्षा प्रवेश पत्र उमेदवारास संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर पत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही. परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र आणणे अनिवार्य आहे. उमेदवाराने प्रवेशपत्राशिवाय स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र)
  5. सदरची परिक्षा ऑफलाईन पध्दतीने असलेने उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचनांची नोंद घेण्यासाठी वारंवार www.kopbankasso.co.in या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; कोल्हापूर यांचे मार्फत पलूस, जि. सांगली येथे आयोजित केली जाणार आहे, परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाईल.
  6. सदर कर्मचारी भरती ही अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमधून बँकेच्या आवश्यकतेनुसार करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  7. अपात्र ठरलेल्या अर्जाच्या बाबतीत आक्षेप असल्यास help@kopbankasso.co.in या Email वरती कळवावे.
  8. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

Palus Sahkari Bank Bharti 2026 – पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment