BSF Bharti 2026: 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.कारण (BSF) सीमा सुरक्षा दल अंतर्गत तब्बल 0549 पदांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीची जाहिरात ही (BSF) सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.त्यामुळे पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) | 549 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी(अधिक माहितीसाठी pdf जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य) 18 वर्ष ते 23
- SC/ST अधिक 05 वर्ष
- OBC अधिक 03 वर्ष
हि पण भरती महत्वाची: 📢 MSRT Recruitment 2025|10 वी ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|आजच अर्ज करा
नोकरीचे ठिकाण
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत भर काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 159/- रुपये
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – फी नाही
अर्ज करण्याची पद्धत
- प्रस्तुत भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी BSF च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
- Login करून संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरा आणि शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 27 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 15 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी
- शारीरिक मानक चाचणी (PST)
- सविस्तर वैद्यकीय तपासणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
- 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- Pwd प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा 27,700/- रुपये ते 69,100/- रुपये पर्यंत.
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमदेवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.
- या भरतीसाठी कागदपत्र पडताळणी, शारीरिक मानक चाचणी (PST) आणि वैद्यकीय तपासणी (DME) साठी बोलावलेल्या सर्व उमेदवारांनी ओळखपत्राच्या उद्देशाने, त्यांनी सादर केलेल्या ऑनलाइन अर्जाची स्पष्ट आणि सुवाच्य प्रिंटआउट सोबत आणणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाणार नाही. ही प्रिंटआउट BSF कर्मचारी कार्यालयीन वापरासाठी स्वतःकडे ठेवतील याची नोंद घ्यावी.
- भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर उमेदवारांनी ऑनलाइन अर्जासोबत सादर केलेल्या पासपोर्ट (BSF Recruitment 2026)आकाराचे पुरेसे फोटो सोबत ठेवावेत.
- विभागीय उमेदवारांनी मूळकागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी त्यांच्या नियोक्त्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मूळ स्वरूपात सादर करावे, अन्यथा त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- मूळ कागदपत्रांची पडताळणी कागदपत्र तपासणीच्या टप्प्यावर केली जाईल, त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही निराशेपासून वाचण्यासाठी सर्व बाबतीत आपली पात्रता निश्चित करण्याचा सल्ला दिला जातो.त्यासाठी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी
निष्कर्ष
BSF Bharti 2026– 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी थेट देश सेवेची मोठ्ठी संधी उपलब्ध झाली आहे. त्याच बरोबर सामाजिक प्रतिष्ठा आणि उच्च वेतनमान देखील मिळत आहे.म्हणून पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
Seen
Job
франшиза One Price цена и отзывы https://oneprice.shop/
http://google.com.sa/url?q=http://oneprice.shop