MPSC Recruitment 2025: सरकारी नोकरीची स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत जाहिरात प्रकाशित केली आहे.
MPSC Bharti 2025- महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नेहमी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत असते,त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासन गट क संवर्गातील विविध जागांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,या भरतीमध्ये 938 जागा भरण्यात येत असून, पात्रता निकष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| उद्योग निरीक्षक 09 | 09 |
| तांत्रिक सहाय्यक 04 | 04 |
| कर सहाय्यक 73 | 73 |
| लिपिक-टंकलेखक 852 | 852 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- उद्योग निरीक्षक हे पद वगळता इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली नाही.
| प्रवर्ग | वयोमर्यादा |
| अमागास प्रवर्ग (General) | 38 वर्ष |
| मागास प्रवर्ग/अनाथ | 43 वर्ष |
हि पण भरती महत्वाची: वनविभाग भरती 2025|मासिक वेतन: 50,000 रुपये|सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 394/- रुपये
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी 294/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
- या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रथम Profile तयार करून घ्यायची आहे.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे आणि गुणपत्रासह स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड कराची आहे.
- Apply ऑप्शन वरती क्लिक करून Check eligibility यावरती क्लिक करा आणि apply करून submit करा.
- Payment करून अर्जाची कार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 07 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 27 ऑक्टोबर 2025
- ऑनलाईन अर्ज फी आकारण्याची अंतिम दिनांक- 27 ऑक्टोबर 2025
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- पूर्व परीक्षा (Prelims)
- मुख्य परीक्षा (Mains)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
वेतनश्रेणी
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- उद्योग निरीक्षक- ३५,४००/- ते १,१२,४००/- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
- तांत्रिक सहायक- २९,२००/-ते ९२,३००/- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
- कर सहायक- २५,५००/-ते ८१,१००/- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देव इतर भत्ते.
- लिपिक-टंकलेखक-१९,९००/-ते ६३,२००/- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
MPSC Recruitment 2025– भरती का खास आहे?
- सरकारी नोकरीची सुरक्षितता(Sarkari Job)–महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत भरती होत,असल्यामुळे सरकारची नोकरीची सुरक्षितता राखली जाते.
- सामाजिक प्रतिष्ठा –MPSC मध्ये भरती होणे म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा आणि उच्च वेतनमान मिळविणे.
- उत्कृष्ट वेतन – शासकीय नियमानुसार मासिक वेतन देण्यात येते,मात्र त्याच बरोबर अधिक महागाई भत्ते देखील देण्यात येतात.व आरोग्य सुविधांचा लाभ मिळतो.
महत्वाच्या सूचना
या भरतीसाठी पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे,आणि अचूक माहिती प्रविष्ट करावी.
- उमेदवारांनी प्रविष्ट केलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास त्या कोणत्याही टप्यावर भरती प्रक्रियेमधून बाद केले जाऊ शकते.
- या भरतीमध्ये देण्यात आलेल्या जागांमध्ये महाराष्ट्र (MPSC) लोकसेवा आयोगाच्या नियमानुसार बद्दल होऊ शकतो.
- ऑनलाईन परीक्षेत निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी दरम्यान शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक गुणपत्रे आणि प्रमाणपत्र सादर करावे लागतील,याची नोंद घ्यावी.
- या भरती संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मूळ जाहिरात pdf वाचावी.
निष्कर्ष
MPSC Recruitment 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत भरती होणे म्हणजे उत्कृष्ट दर्जाची नोकरी मिळविणे असे मानले जाते.त्यासाठी अनेक पदवीधर उत्तीर्ण उमेदवार प्रयत्न करत असतात.या भरतीमध्ये नमूद करण्यात आलेली पदे ही अतिशय महत्त्वाची आणि योग्य असल्यामुळे,पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी आहे.त्यासाठी त्यांनी 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अर्ज अधिकृत संकेतस्थळावरती भरून घ्यायचा आहे.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा