सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य,पुणे भरती|Sainik Kalyan vibhag Recruitment 2025

Sainik Kalyan vibhag Recruitment 2025: सैनिक कल्याण विभाग हा महाराष्ट्र राज्याचा विविध योजना राबविणार एक विभाग असून,या मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Sainik Kalyan vibhag Bharti 2025- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालीलजिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) मधील सरळसेवेतील पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच या भरतीसाठी 05 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आली आहे.

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
लिपीक-टंकलेखक  72

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा वा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 30 शब्द असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ज्याच्या जवळ असायला हवे.
  • सशस्त्र दलामध्ये ज्यांनी 15 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • 05 नोव्हेंबर 2025 रोजी ज्याचे वय 45 वर्षापेक्षा जास्त असेल असे उमेदवार पात्र आहेत.

हि पण भरती महत्वाची: ठाणे महानगरपालिका भरती 2025| मासिक वेतन:18,000 ते 20,000 रुपये पर्यंत

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
प्रवर्ग फी
अराखीव (OPEN) 1000/- रुपये
मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक 900/- रुपये

टीप– परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.

अर्ज करण्याची पद्धत
  • अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील.तसेच  अर्ज सादर करण्याकरीता वेबसाईट  www.mahasainik.maharashtra.gov.in येथे जाऊन(Resources Tab > Recruitment tab मध्ये लिंक उपलब्ध केली आहे.
  • त्याठिकाणी संपूर्ण माहिती भरून ऑनलाईन अर्ज फी भरून आपला अर्ज सबमिट करायचा आहे.आणि अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्यायची आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 14 ऑक्टोबर  2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 05 नोव्हेंबर 2025
  • परीक्षा  दिनांक – नंतर कळविण्यात येईल.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • ऑनलाईन परीक्षा (Online EXAM-CBT)
  • दस्तावेज पडताळणी (Document Verification)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे

  •  पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • 10 वी/12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • पदवी चे प्रमाणपत्र
  • डिप्लोमा प्रमाणपत्र
  • पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र
  • राज्य अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा (माजी सैनिक ओळखपत्र)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये.

Sainik Kalyan vibhag Recruitment 2025–ही भरती का महत्वाची आहे ?

  • सामाजिक जबाबदारी आणि अभिमान:- सैनिक कल्याण विभागात काम करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी योगदान देणाऱ्या वीरांचा सन्मान राखणे — ही एक जबाबदारी आणि अभिमानाची गोष्ट आहे.
  • सरकारी नोकरीचे स्थैर्य आणि प्रतिष्ठा:-सैनिक कल्याण विभाग हे राज्य शासनाच्या अंतर्गत कार्यरत असल्याने सरकारी सेवेत स्थैर्य, वेतन आणि इतर सुविधा मिळतात.
  • देशसेवकांच्या सेवेसाठी काम करण्याची संधी:या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी थेट काम करण्याची संधी मिळते. हे कार्य समाजसेवा आणि राष्ट्रसेवा या दोन्हींचे मिश्रण आहे.

महत्वाच्या सूचना

  1. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी वैध ई-मेल (Email) आयडी प्रविष्ठ करणे अनिवार्य आहे.
  2. ऑनलाईन अर्ज अचूक भरण्याची जबाबदारी उमेदवारांची  राहील. त्या अनुषंगाने कोणतीही तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही. अपात्र उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविले जाणार नाही. उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
  3. पात्रते संदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  4. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेस येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
  5. भरती संदर्भात अधिकमाहिती मिळविण्यासाठी pdf जाहिरात वाचावी.

निष्कर्ष

Sainik Kalyan vibhag Recruitment 2025-  ही भरती फक्त नोकरी मिळवण्यासाठी नव्हे, तर देशसेवकांच्या सेवेसाठी काम करण्याची सन्माननीय संधी आहे.स्थिर सरकारी पद,सामाजिक प्रतिष्ठा आणि देशभक्तीची भावना या तिन्हींचा संगम या भरतीत आहे.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज 05 नोव्हेंबर 2025 पर्यंत करायचा आहे.

 

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment