RRC NER Recruitment 2025: भारतीय रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण RRC उत्तर पूर्व रेल्वे विभागाने नवीन जाहिरात प्रकाशित केलेली आहे.
RRC NER Bharti 2025- RRC NER उत्तर पूर्व रेल्वे विभागा अंतर्गत अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून सदर जाहिरातीमध्ये अप्रेंटिस हे रिक्त पद भरण्यात येत आहे.या या भरतीमध्ये एकूण 1104 जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देशांक देण्यात आलेले आहेत.भारतीय रेल्वे विभागामध्ये आपल्या कॅरिअरची सुरुवात करण्याची ही उमेदवारांसाठी मोठी संधी असू शकते. उमेदवारांना 15 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.या भरती विषयी अधिक माहिती खालील लेखांमध्ये दिली आहे.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| अप्रेंटिस | 1104 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अप्रेंटिस | मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.तसेच ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.. |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
| प्रवर्ग | वयोमर्यादा -16 ऑक्टोबर 2025 रोजी |
| General (सामान्य) | 5 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. |
| SC/ST | अधिक 05 वर्ष सूट |
| OBC | अधिक 03 वर्ष सूट |
| दिव्यांग | अधिक 10 वर्ष सूट |
हि पण भरती महत्वाची: ठाणे महानगरपालिका भरती 2025| मासिक वेतन:18,000 ते 20,000 रुपये पर्यंत
नोकरीचे ठिकाण
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय RRC उत्तर पूर्व रेल्वे विभागामध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- General/OBC/EWS – 100/- रुपये
- SC/ST/PWD/महिला -अर्ज फी नाही
अर्ज करण्याची पद्धत
- RRC NER उत्तर पूर्व रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- मुख्य पेज, अॅक्ट अप्रेंटिस ट्रेनिंग नोटिफिकेशन 2026-27 ची लिंक वरती क्लिक करा.
- ऑनलाईन अर्ज यावरती क्लिक करून तुमची नोंदणी करून घ्या.आणि लॉगिन करून अधिक माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र अपलोड करून घ्यावीत.
- Payment ऑप्शन वरती क्लिक करून पेमेंट करून आपला अर्ज सबमिट करून घ्यावा त्यानंतर अर्धा चे हार्ड कॉपी प्रिंट करून घ्यावे जेणेकरून येणाऱ्या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 15 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 16 नोव्हेंबर 2025
- दस्तावेज पडताळणी दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- गुणवता यादी (Merit list)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना वेतन मिळणार आहे.
RRC NER Recruitment 2025–भरती का निवडावी?
- सरकारी नोकरीची खात्री –भारतीय RRC NER उत्तर पूर्व रेल्वे विभागा पूर्णपणे भारत सरकारच्या अधिपत्याखाली काम करत असतो त्यामुळे सरकारी नोकरीची स्थिरता आहे.
- करिअरची संधी – रेल्वे विभागामध्ये काम करण्याचा चांगल अनुभव मिळविण्यात यश मिळणार आहे.
- विकासाची दारे – भविष्यात उच्च पदांसाठी या भरतीचा अनुभव कामी येऊ शकतो.
- उत्तम वेतन – चांगल्या वेतनाची नोकरी मिळवण्याची संधी आणि सुरक्षितता आहे.
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी केवळ RRC NER उत्तर पूर्व रेल्वे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा. जेणेकरून येणाऱ्या अधिक सूचना तुमच्या ईमेल वरती कळविण्यात येतील.
- ऑनलाईन अर्जामध्ये प्रविष्ठ केलेली माहिती पूर्णपणे खरी असली पाहिजे,कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
- RRC NER उत्तर पूर्व रेल्वे विभागाने नमूद केलेल्या पदांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते,याची नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला जाणार नाही.तसेच मुलाखती साठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांनी आवश्यक दस्तावेज सादर केला नाही तर त्या उमेदवारांची निवड रद्द करण्याची अधिकारी RRC NER उत्तर पूर्व रेल्वे विभागाला असतील.
- भरती संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी वरती दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
निष्कर्ष
RRC NER Recruitment 2025- या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना केवळ प्रशिक्षणच नव्हे तर ही एक भारतीय रेल्वेमध्ये अनुभव मिळवण्याचे खूप मोठ्ठी संधी असणार आहे.तसेच पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आपल्या करिअरची सुरुवात सुद्धा या भरतीद्वारे करता येणार आहे.या भरतीमध्ये रेल्वे वर्कशॉप आणि विभागांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड मिळतो आणि भविष्यात रेल्वेत नोकरीच्या संधी मिळू शकतात.उमेदवारांनी आपला अर्ज 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचा आहे .
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा