Parbhani Mahanagarpalika Recruitment 2025: परभणी महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय (NHM Parbhani) आरोग्य अभियान मध्ये विविध पदांसाठी नवीन जाहिरात भरती प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे आरोग्य विभागात नोकरी शोधणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी खास ठरणार आहे.प्रस्तुत भरती ही परभणी महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाली असून,पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी 17 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी / Full Time Medical Officer – UPHC | 03 |
| अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer-UPHC | 07 |
| Microbiologist (मायक्रोबायोलॉजीस्ट) | 01 |
| सार्वजनिक आरोग्य विस्थापक / Public Health Manager | 01 |
| स्टाफ नर्स / Staff Nurse – UPHC | 02 |
| औषधी निर्माता / Pharmacists – UPHC | 02 |
| ए एन एम / ANM – UPHC | 05 |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ / ab Technician – UPHC | 02 |
| लेडी हेल्थ व्हिजिटर, LHV UPHC | 02 |
| स्त्रीरोग तज्ञ / Obstetrician/Gynaecologist – UCHC | 01 |
| बालरोग तज्ञ / Paediatrician UCHC | 01 |
| भूलतज्ञ / Anaesthetist-UCHC | 01 |
| शल्य चिकित्सक / Surgeon – UCHC | 01 |
| Pathologist – UCI C | 01 |
| क्ष-किरणशास्तज्ञ / Radiologists – UCHC | 02 |
| दंत शल्य चिकित्सक / Dentists – UCHC | 01 |
| पूर्णवेळ वैद्यकीय आं कारी / Full Time Medical Officer – UCHC | 04 |
| स्टाफ नर्स / Staff Nurse UCHC | 02 |
| औषधी निर्माता / Pharmacist – UCHC | 03 |
| वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – UHWC | 13 |
| स्टाफ नर्स / Staff Nurse – UHWC | 03 |
| बहुउद्देशीय पुरुष क चिारी / MPW Male – UHWC | 07 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी असल्यामुळे खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य) 38 वर्ष
- SC/ST अधिक 05 वर्ष
- OBC अधिक 03 वर्ष
हि पण भरती महत्वाची: 📢 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी|एकुण जागा:025,487| आजच अर्ज करा
नोकरीचे ठिकाण
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना परभणी महानगरपालिका (Parbhani Job 2025)
अंतर्गत काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 150/- रुपये
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 100/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
- पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी खाली विहित नमुना अर्ज देण्यात आला आहे
- त्यासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 10 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 17 डिसेंबर 2025
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- मुलखात (Interview)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| नमुना अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
NHM Recruitment Maharashtra
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- शाळा सोडण्याचा दाखला
- वयाचा पुरावा (10 गुणपत्रक)
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- डोमासेल प्रमाणपत्र/आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये पर्यंत
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील याची नोंद घ्यावी.
- सदरील पदे ठराविक मासिक मानधनावर शासनाच्या धोरणानुसार वेतनात बदल होऊ शकतो.
- सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरवायची असल्याने प्रकल्प बंद होताच सदरीत पदे आपोआप संपुष्टात येतील.
- निवड झालेल्या उमेद्वाराना 19 महिने 29 दिवस किंवा मा.आयुक्त तथा अध्यक्ष ठरवतील तोपर्यंत Parbhani Mahanagarpalika Bharti 2025 नियुक्ती आदेश देय राहील.
- उमेदवारांनी मूळ व छायांकित कागदपत्रासह (मुलाखतीसाठी स्वतः खर्चाने उपस्थित राहावे.)
- पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात वाचावी.
निष्कर्ष
Parbhani Mahanagarpalika Recruitment 2025– आरोग्य विभागात चांगल्या वेतनाची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवारांना वेळ वाया न घालवता दिलेल्या पत्त्यावरती शेवटच्या तारखेच्या आधी आपला अर्ज सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा