NHM Nagpur Bharti 2025: आरोग्य विभागात नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.कारण राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
NHM Nagpur Bharti 2025
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म.न.पा. नागपूर अंतर्गत
एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स, महानगरपालिका नागपूर अंतर्गत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.प्रस्तुत भरती ही केवळ कंत्राटी पद्धतीने होत असून, अहर्ता धारक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज दाखल कराचे आहे.उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे होणार आहे.त्यासाठी 16 ऑक्टोबर 2025 रोजी 10:00 ते 12:00 वाजेपर्यंत मुलाखत घेण्यात येणार आहे.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| पूर्णवेळ वैद्यकिय अधिकारी (MBBS) | 18 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
पूर्णवेळ वैद्यकिय अधिकारी: एम.बी.बी.एस.(MBBS)व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदनी आवश्यक,अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
- कमाल वयोमर्यादा 69 वर्षे सर्व प्रवर्गासाठी (वय वर्ष 60 नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडून शारीरीक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे)
हि पण भरती महत्वाची: वनविभाग भरती 2025|मासिक वेतन: 50,000 रुपये|सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय नागरी आरोग्य (U-HWC) नागपूर महानगरपालिका अंतर्गत काम करण्याची संधी मिळेल.आरोग्य क्षेत्रात कामाचा अनुभव घेण्याची मोठ्ठी संधी आहे.
अर्ज फी
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही म्हणून सर्व सामान्य उमेदवारा सुद्धा अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, फोटो, सही इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत पाठवावीत.
- चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2025
- मुलाखतीची दिनांक 16 ऑक्टोबर 2025
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
NHM Nagpur Bharti 2025– का निवडावी?
आरोग्य क्षेत्रात नोकरीची खात्री – आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग अनुभव घेण्याची चांगली संधी आहे.
करिअरची संधी – नवीन उमेदवारांना आपल्या करिअरची सुरुवात करायची योग्य वेळ असू शकते.
विकासाची दारे – भविष्यात उच्च वेतनमान मिळविण्यासाठी या भरतीचा अनुभव कामी येऊ शकतो.
अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढुन आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स अर्जाला संलग्न करुन मुलाखतीकरीता उपस्थित राहावे. सदर पदांकरीता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
- आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपुर महानगरपालिका
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी अनुभवाच्या बाबतीत खाजगी व शासकीय अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
- अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा, व अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झाला नसावा,
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी मुलाखतीकरीता सकाळी 10.00 वाजता सर्व आवश्यक दस्ताऐवजांसह उपस्थित राहावे. सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी (NHM Nagpur Bharti 2025)कसलाही संबंध राहणार नाही. पदांसाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे
- वरील सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
- एकुण पदांच्या संगवेत अथवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
निष्कर्ष
NHM Nagpur Bharti 2025 या भरतीमध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना चांगले वेतन तर मिळणारच आहे,मात्र वनविभागात काम म्हणून सामाजिक प्रतिष्ठा मिळविणे आणि सामाजिक कार्याची देखील कामगिरी मिळविणे ही संधी मिळणार आहे.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा.