Jalgaon DCC Bank Recruitment 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.कारण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नवीन भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
Jalgaon DCC Bank Bharti 2025- जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपीक पदासाठी तब्बल 220 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे निर्देश देण्यात आले आहेत.या भरतीसाठी 31ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आली आहे.अधिक माहिती सविस्तर खालील लेखात देण्यात आली आहे.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| लिपीक | 220 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- लिपीक: या भरतीसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 50% गुणांसह कोणताही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावा.
- शासनमान्य संस्थेतून MS-CIT उत्तीर्ण केलेली असावी.
- कोणताही शाखेतून बीई उत्तीर्ण उमेदवारांसाठी सदरची अट शिथिल राहील.
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
| किमान | 21 वर्ष |
| कमाल | 35 वर्ष |
हि पण भरती महत्वाची: ठाणे महानगरपालिका भरती 2025| मासिक वेतन:18,000 ते 20,000 रुपये पर्यंत
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये (jddcbank) काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- या भरतीसाठी 1000/- रुपये (सर्व करांसह) अर्ज फी आकारले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत
- या भरतीसाठी करीता बँकेच्या www.jdccbank.com व www.jalgaondcc.com या अधिकृत संकेतस्थळावरती भेट देऊन आपला अर्ज भरून घ्यायचा आहे.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक सर्व दस्तावेज आणि फोटो व स्वाक्षरी अपलोड करून घ्यावीत.
- अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरून अर्ज सबमिट करून घ्या.आणि अर्जाची हार्ड कॉपी करून घ्यावी.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 19 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 31 ऑक्टोबर 2025
- ऑनलाईन अर्ज फी आकारण्याची अंतिम दिनांक- 31 ऑक्टोबर 2025
- ऑनलाईन परीक्षा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- ऑनलाईन परीक्षा (Online Exam)
- प्रत्यक्ष मुलखात (Interview)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा 13,000/- रुपये संकलित वेतन देण्यात येणार आहे.
Jalgaon DCC Bank Recruitment 2025–ही भरती का निवडावी?
- अनुभव घेण्याची चांगली संधी– बँकिंग क्षेत्रात नोकरी आणि अनुभव मिळविण्याची उत्तम संधी आहे.
- करिअर वाढीची संधी– योग्य वेतन आणि अनुभव 2 गोष्टी मुळे तुम्हाला पुढील नोकरीमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे.
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती अर्ज करायचे आहेत.त्या व्यतिरिक्त कोणतेही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल (Email) आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा/अपूर्ण तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिये दरम्यान त्याव्दारे पाठविल्या जाणाऱ्या सुचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधित उमेदवाराची राहील तसेच ई-मेल आयडी व संकेत वहनात येणाऱ्या तांत्रीक अडचणींना बँक जबाबदार राहणार नाही.
- या भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर याबाबत वेळोवेळी भेट घेऊन भरती प्रक्रियेची अद्यावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
- उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे व पुरावे अपलोड करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्याने भरतीच्या कुठल्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित उमेदवाराची राहील, व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही.
- ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही.जाहिरातीत नमुद केलेल्या सर्व अटी व शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा.
- ऑनलाईन परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले जाईल.
- या भरतीसाठी नमूद करण्यात आलेल्या पदांमध्ये वाढ किंवा घट करण्याचे संपूर्ण निर्णय बँकेला आहेत.अधिक माहितीसाठी मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
निष्कर्ष
Jalgaon DCC Bank Recruitment 2025- जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (JDCC Bank) ही महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख सहकारी बँक आहे. ही बँक जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात शेती, लघुउद्योग, व्यापारी व व्यक्तिगत ग्राहकांना आर्थिक सेवा पुरवते.त्यामुळे निवड होणाऱ्या उमेदवारांना चांगली नोकरी आणि अनुभव या दोन्ही गोष्टी मिळणार आहेत.त्यासाठी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करायचे आहेत.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा