ITBP Recruitment 2025: भारतीय सैन्य दलात नोकरी ही तरुण/तरुणींची पहिली परिस्थिती ठरते? आणि त्यांच्या साठी आनंदाची बातमी आहे कारण,भारतीय सैन्य (ITBP)दलात नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीची जाहिरात इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून,त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| उपन्यायाधीश अॅटर्नी जनरल (उप कमांडंट) | 07 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यात बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा समतुल्य पदवीसह कायदेशीर व्यवसायात 07 वर्षांचा अनुभव किंवा कायद्यात पदव्युत्तर पदवीसह 05 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- वकील म्हणून नोंदणीसाठी पात्रता असणे आवश्यक आहे.(अधिकृत pdf जाहिरात वाचावी )
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- सर्व उमेदवारांसाठी कमाल – 40 वर्ष
हि पण भरती महत्वाची: 📢 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी|एकुण जागा:025,487| आजच अर्ज करा
नोकरीचे ठिकाण
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 400/- रुपये
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – फी नाही
अर्ज करण्याची पद्धत
- प्रस्तुत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत (ITBP) वेबसाइटवर भेट द्या.
- New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
- Login करून संपूर्ण माहिती भरून घ्या आणि शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Payment करून अर्ज Submit करा व अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 02 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 31 डिसेंबर 2025
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- शारीरिक चाचणी
- वैद्यकीय तपासणी
- दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- शाळा सोडण्याचा दाखला
- वयाचा पुरावा (10 गुणपत्रक)
- 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- 67,700/- रुपये ते 20,8,700/- रुपये पर्यंत
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमदेवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी ITBP च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.तसेच अर्ज करण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
- अर्ज हा अचूक भरावा,कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी भरतीच्या प्रत्येक टप्यावर आपले पासपोर्ट आकाराचे 04 फोटो सोबत ठेवावेत.
- भरती संदर्भात अधिक नियम आणि अटी ITBP राखून ठेवत आहे.
- पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
निष्कर्ष
ITBP Recruitment 2025– इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस. ही भारताची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी एक महत्त्वाची फोर्स असून पोलिस दलात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी भारतीय उमेदवारांना मिळणार आहे.त्यामुळे विहित तारखेत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
Police