District Hospital Beed Recruitment 2025District Hospital Beed Recruitment 2025: जिल्हा रुग्णालयात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना कळविण्यात आनंद होतो की,जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
District Hospital Beed Bharti 2025- नागरी शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS), वडाळा, मुंबई यांच्या अंतर्गत कार्यान्वित प्रकल्पासाठी करारनुसार नियुक्तीकरिता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून,पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील अधिक माहितीसाठी pdf वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| समुपदेशक (ICTC) | 01 |
| समुपदेशक (BloodBank) | 02 |
| लॅब टेक्निशियन | 02 |
| स्टाफ नर्स | 02 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- समुपदेशक (ICTC):मानसशास्त्र/समाजकार्य/समाजशास्त्र/मानववंशशास्त्र/मानवविकास/नर्सिंग या विषयात पदवीधर पदवीधारक. तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशन/शिक्षणाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- समुपदेशक (BloodBank): सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानसशास्त्र/मानवशास्त्र/मानवविकास या विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- लॅब टेक्निशियन: वैद्यकीय प्रयोगशाळेतील पदवी तंत्रज्ञान (M.L.T.) किंवा वैद्यकीय प्रयोगशाळेतील पदविका तंत्रज्ञान (M.L.T.) पदविका किंवा पदवी मिळविण्यापूर्वी 10+2 उत्तीर्ण असावे.
- स्टाफ नर्स: BSC Nursing किंवा GNM उत्तीर्ण केलेली असावी.(राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत केलेली असावी)
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- जाहिरातीच्या दिनांकापासून कमाल वयोमर्यादा 60 वर्षे आहे.कंत्राटी सेवेसाठी 62 वर्षांपर्यंतची मुदत लागू असेल.
हि पण भरती महत्वाची: ठाणे महानगरपालिका भरती 2025| मासिक वेतन:18,000 ते 20,000 रुपये पर्यंत
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा रुग्णालय बीड मध्ये (District Hospital Beed) काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज फी आकारली जाणार नाही.त्यामुळे सर्वसामाने नागरिकांना सुद्धा संधी आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- इच्छुक उमेदवार विहित अर्ज फॉर्ममध्ये अलिकडच्या पासपोर्ट आकाराचे फोटो आणि गुणपत्र/प्रमाणपत्रे/ओळखपत्रे इत्यादींच्या साक्षांकित छायाप्रतींसह अर्ज करू शकतात.
- अर्ज नोंदणीकृत/स्पीड पोस्टद्वारे पाठवता येतील किंवा जाहिरात केलेल्या तारखेपासून ते उमेदवार अर्ज करू इच्छित असलेल्या शेवटच्या दिनांक पर्यंतच्या सर्व कामकाजाच्या दिवशी “सिव्हिल सर्जन कार्यालय, जिल्हा रुग्णालय बीड” च्या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करता येतील.
अर्ज करण्याचा पत्ता
- जिल्हा रुग्णालय, सिव्हिल सर्जन कार्यालय बीड (Civil Surgeon Office, District Hospital Beed)
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 17 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 31 ऑक्टोबर 2025
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे.
- लेखी परीक्षा (Written Exam)
- प्रत्यक्ष मुलखात (Interview)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| नमुना अर्ज | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
| पदाचे नाव | मासिक वेतन |
| समुपदेशक (ICTC) | 21,000/- रुपये |
| समुपदेशक (BloodBank) | 21,000/- रुपये |
| लॅब टेक्निशियन | 25,000/- रुपये |
| स्टाफ नर्स | 21,000/- रुपये |
District Hospital Beed Recruitment 2025–भरतीचे मुख्य वैशिष्ट्य!
- प्रकल्प – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS)
- भरती करणारा विभाग- नागरी शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड
- वेतन श्रेणी- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या नियमांनुसार असेल.
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्जामध्ये प्रविष्ठ केलेली माहिती पूर्णपणे खरी असली पाहिजे,कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
- प्रत्येक पदासाठी उमेदवाराने वेगळा अर्ज करणे आवश्यक आहे.
- निश्चित तारखेत प्राप्त झालेल्या अर्जांचे परीक्षण केल्यानंतर, पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा / मुलाखतीसाठी बोलावले जाईल.ऑनलाईन परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले जाईल.याची नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रचार/घूस देणे-घेणे केल्यास उमेदवाराची पात्रता रद्द केली जाईल.(अधिक माहितीसाठी मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी)
निष्कर्ष
District Hospital Beed Recruitment 2025- जिल्हा रुग्णालय, बीड अंतर्गत MSACS, मुंबई यांच्या प्रकल्पासाठी वरील नमूद करण्यात आलेली पदांची करारनुसार नियुक्ती केली जाणार आहे.त्यामुळे आरोग्य विभागात पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मोठ्ठी संधी मिळणार आहे.त्यासाठी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अर्ज पोस्टाद्वारे किंवा स्वतः जमा करणे.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
rushikeshvyapari03@gmail.com
Ot technitian