BSF Recruitment 2025|भारतीय सीमा सुरक्षा दल भरती 2025

BSF Recruitment 2025: भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवणे हे सद्यस्थिला अनेक तरुणांचे स्वप्न आहे.त्यांच्या प्रयत्ना यश देण्याकरिता भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BSF Bharti 2025- भारतीय सीमा सुरक्षा दल अंतर्गत खेळाडू उमेदवारांकरिता चांगली संधी निर्माण करून दिली आहे.या भरतीमध्ये sport quota कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) ही पद भरण्यात येत आहे.त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यासाठी 04 नोव्हेंबर 2025 ही अंतिम दिनांक येण्यात आली आहे.भरती संदर्भात अधिक माहिती खाली सविस्तर वाचा.

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
कॉन्स्टेबल (General duty) 0391

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • कॉन्स्टेबल (GD): 10 वी उत्तीर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

क्रीडा क्षेत्रातील पात्रता

  • आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने भारतीय संघाचा सदस्य म्हणून मान्यता दिलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेला किंवा पदके जिंकलेला खेळाडू किंवा भारतीय ऑलिंपिक संघटना, क्रीडा महासंघाने मान्यता दिलेल्या कोणत्याही राष्ट्रीय खेळ/चॅम्पियनशिप/राष्ट्रीय खुल्या स्पर्धेत पदके जिंकलेला खेळाडू (संबंधित खेळ) 04 नोव्हेंबर 2023 ते 04 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय पातळीवरील अजिंक्यपद/चॅम्पियनशिपमध्ये (संबंधित खेळांमध्ये) पदके जिंकलेला खेळाडू या भरतीसाठी पात्र आहेत.(अधिकृत pdf वाचा)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली नाही.

प्रवर्ग वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2025 पर्यंत 
(General)सामान्य 18 वर्ष 23 वर्ष दरम्यान असावे.
SC/ST अधिक 05 वर्ष सूट
OBC अधिक 03 वर्ष सूट

 

हि पण भरती महत्वाची: वनविभाग भरती 2025|मासिक वेतन: 50,000 रुपये|सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये (All India) काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)

General/EWS/OBC 159/- रुपये
SC/ST/ महिला फी मध्ये सूट आहे.

 

अर्ज करण्याची पद्धत
  • BSF च्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्या.आणि New Requirment या ऑप्शन वरती क्लिक करून तुमची profile तयार करा.
  • अर्ज करताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, छायाचित्र व सही यांची स्कॅन प्रत आवश्यक आहे.
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
  • अर्ज फी ऑनलाईन माध्यमातून भरावी
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट आउट घ्यावी.
महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 16 ऑक्टोबर  2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 04 नोव्हेंबर 2025
  • ऑनलाईन अर्ज फी आकारण्याची अंतिम दिनांक- 04 नोव्हेंबर 2025

निवड प्रक्रिया 

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • दस्तावेज पडताळणी (Document Verification)
  • मैदानी चाचणी (Ground)
  • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा

 

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF)नियमानुसार दरमहा 21,700 ते 69,100 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.

BSF Recruitment 2025– भरतीचे वैशिष्ट्य काय?

  • देशसेवेची संधी – भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) हे पाकिस्तान आणि बांगलादेशसह देशाच्या सीमांचे संरक्षण करते. त्यामुळे या भरतीत सहभागी होणाऱ्या तरुणांना थेट देशसेवेची व देशरक्षणाची संधी मिळते.
  • सामाजिक प्रतिष्ठा – BSF मध्ये भरती होणे म्हणजे समाजात प्रतिष्ठा, सन्मान आणि आदर प्राप्त करणे. BSF जवान हे देशाच्या सुरक्षेचे खरे रक्षक मानले जातात.
  • उत्कृष्ट वेतन आणि सुविधा – शासकीय नियमानुसार मासिक वेतनासोबत महागाई भत्ता, प्रवास भत्ता, राहण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन इत्यादी लाभ दिले जातात.

महत्वाच्या सूचना

  •  या भरतीसाठी कागदपत्रांसाठी बोलावण्यात आलेल्या सर्व उमेदवारांनी, PST आणि DME ओळख पटविण्यासाठी सादर केलेल्या ऑनलाइन अर्ज फॉर्मचे स्पष्ट आणि सुवाच्य प्रिंट आउट आणावे.अन्यथा त्यांना ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रिंट आउट BSF कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वापरासाठी राखून ठेवली जाईल.
  • उमेदवारांनी भरतीच्या सर्व टप्प्यांवर ऑनलाइन अर्ज फॉर्मसोबत सादर केलेले पुरेसे पासपोर्ट आकाराचे फोटो ठेवावेत.
  • विभागीय उमेदवारांनी मूळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी त्यांच्या नियोक्त्याकडून मूळ “ना हरकत प्रमाणपत्र” सादर करावे अन्यथा त्यांची उमेदवारी नाकारली जाईल.
  • मूळ कागदपत्रांची पडताळणी कागदपत्रांच्या टप्प्यावर केली जाईल, म्हणून उमेदवारांना कोणत्याही प्रकारची निराशा टाळण्यासाठी त्यांच्या पात्रतेची पुष्टी करण्याचा सल्ला दिला जातो.
  • सर्व पात्र उमेदवारांना भरती परीक्षेची तारीख आणि ठिकाण याबद्दल माहिती दिली जाईल. ही माहिती त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल आणि BSF भरती वेबसाइट https://rectt.bsf.gov.in वरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे निर्देश दिले जातील.म्हणून, उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना वैध आणि कार्यात्मक ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर द्यावा.
  • या भरतीसाठी उमेदवाराने त्याचे लॉगिन तपशील विसरल्यास BSF जबाबदार राहणार नाही.

निष्कर्ष

BSF Recruitment 2025- क्रीडा क्षेत्रात मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या तरुण उमेदवारांना सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरी मिळवण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झालेली आहे.BSF या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना योग्य वेतन आणि माणसांना या दोन्ही गोष्टी एकत्रित मिळणार आहेत त्यामुळे अंतिम दिनांक च्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यायचा आहे.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

1 thought on “BSF Recruitment 2025|भारतीय सीमा सुरक्षा दल भरती 2025”

Leave a Comment