भूमी अभिलेख नाशिक विभाग भरती|Bhumi Abhilekh Vibhag Nashik Recruitment 2025

Bhumi Abhilekh Vibhag Nashik Recruitment 2025: सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.कारण भूमी अभिलेख नाशिक विभाग अंतर्गत नवीन भरती प्रकाशित केलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bhumi Abhilekh Vibhag Nashik Bharti 2025:- भूमि अभिलेख विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीमध्ये भूकरमापक हे पद भरण्यात येत असून, सरकारी नोकरी आणि चांगले वेतन मिळविण्याची उत्तम संधी उमेदवारांना मिळणार आहे.या भरतीसाठी 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

 एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पदसंख्या 
भूकरमापक 124 124

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  •  भूकरमापक: मान्यता महाविद्यालयातील किवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्त्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे
श्रेणी वयोमर्यादा
(सामान्य)General 38 वर्ष पर्यंत
दिव्यांग 45 वर्ष पर्यंत
SC/ST जास्तीत जास्त 05 वर्ष सवलत

 

हि पण भरती महत्वाची: वनविभाग भरती 2025|मासिक वेतन: 50,000 रुपये|सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना भूमी अभिलेख विभाग नाशिक अंतर्गत काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)

वर्ग फी 
अमागास प्रवर्ग 10,00/- रुपये
मागास प्रवर्ग  900/- रुपये

 

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी केवळ ऑनलाइन (Online)पद्धतीने अर्ज करावा.त्यासाठी https://ibpsreg.ibps.in/gomsep25/https://mahabhurni.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • दिलेल्या Online Application Form वर क्लिक करून योग्य माहिती भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, ओळखपत्र इ.) अपलोड करावीत.
  • अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरावी.
  • शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवावी.
महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 01 ऑक्टोबर  2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 24 ऑक्टोबर 2025
  • परीक्षेचा प्रस्तावित दिनांक – 13,14, नोव्हेंबर 2025

निवड प्रक्रिया 

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • ऑनलाईन परीक्षा (CBT Exam)
  • दस्तावेज पडताळणी (Document Verification)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा

 

पगार आणि अधिक सुविधा 

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे पगार आणि सुविधा मिळणार आहेत.

  • स्केल एस-6 नुसार दरमहा 19,900/- रुपये ते 63,200 रुपये पर्यंत.
  • यासोबतच भत्ते,वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता, निवृत्ती योजना यांचा समावेश असेल.

Bhumi Abhilekh Vibhag Nashik Recruitment 2025– का निवडावी ही नोकरी ?

  • सरकारी नोकरीची खात्री (Govt job)– महाराष्ट्र सरकारच्या  अंतर्गत असल्यामुळे ही भरती अत्यंत स्थिर आणि सुरक्षित आहे.
  • करिअर वाढीची संधी – जमीन मोजणी आणि इतर संबंधित कामांसाठी माहिती क्षेत्रात अनुभव मिळेल.
  • योग्य वेतन– गट क संवर्गातील पद असल्यामुळे चांगले वेतन आणि अधिक सुविधा मिळणार आहेत.

महत्वाच्या सूचना 

  •  या भरतीसाठी परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरुप, परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास रहातील व विभागाचा निर्णय (Bhumi Abhilekh Vibhag Nashik Bharti 2025) अंतिम असेल. त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वा तक्रारीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विभागास राहील व विभागाचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही, तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपुर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही.
  • ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहीरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.
  • उमेदवारांची परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्व तपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे केवळ या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत.
  • उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या  गुणांच्या आधारे तसेच त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतिम यादी प्रसिद्ध करुन उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
  • पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवाराला भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी राखून ठेवीत आहेत.
  • उमेदवारास परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीस स्वखर्चाने यावे लागेल.(अधिक माहितीसाठी pdf वाचावी)

निष्कर्ष

  • भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Nashik Bharti 2025), महाराष्ट्र शासन हा विभाग महाराष्ट्र राज्यातील जमिनींचे अभिलेख जतन करणे, अद्ययावत ठेवणे आणि नागरिकांना त्याची प्रमाणित प्रत उपलब्ध करून देणे यासाठी कार्य करतो.त्यामुळे अहर्ता धारक उमेदवारांना चांगले काम मिळणार आहे.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment