Bank of India Recruitment 2025: 514 क्रेडिट ऑफिसर पदांची भरती | पगार ₹1.20 लाख

Bank Of India Recruitment 2025: बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाची नोकरी शोधताय? तर मग ही जाहिरात तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे कारण,बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 514 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना चांगली संधी मिळणार आहे.प्रस्तुत भरतीची जाहिरात ही बँक ऑफ इंडिया (BOI) च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी 05 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे. सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
क्रेडिट अधिकारी  514

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • कोणत्याही शाखेतील पदवी (ग्रॅज्युएशन) 60% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेडसह (SC/ST/OBC/ Pwd  साठी 55%), चार्टर्ड अकाउंटंट/चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट/ सीएमए – आयसीडब्ल्यूए किंवा बँकिंग/फायनान्समध्ये एमबीए/पीजीडीबीएम किंवा बँकिंग/फायनान्स/कोणत्याही क्रेडिट-संबंधित क्षेत्रातील 02 वर्षांची पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी+ अनुभव आवश्यक आहे.(मूळ pdf जाहिरात वाचा)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • General (सामान्य) 25 वर्ष ते 40
  • SC/ST अधिक 05 वर्ष
  • OBC अधिक 03 वर्ष

हि पण भरती महत्वाची: 📢 MSRT Recruitment 2025|10 वी ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|आजच अर्ज करा

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत भर काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  • खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 850/- रुपये
  • मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी 175/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  1. प्रस्तुत भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी Bank Of India च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरा आणि शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  20 डिसेंबर 2025
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  05 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. ऑनलाईन परीक्षा
  2. मुलाखत
  3. दस्तावेज पडताळणी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

Bank Of India Recruitment 2025

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
  3. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  4. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  5. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  6. Pwd प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  7. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा 64,820/- रुपये ते 1,20,940/- रुपये पर्यंत.

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमदेवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.
  2. नमूद पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने या जाहिरातीत नमूद केलेली पात्रता आणि इतर निकष पूर्ण करत असल्याची  खात्री करावी. त्यामुळे उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे.
  3. ऑनलाइन अर्जामध्ये नमूद केलेल्या जाती/जमातीचा आपण सदस्य आहोत याची खात्री करणे ही उमेदवाराची प्राथमिक जबाबदारी आहे.
  4. निवड प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींमध्ये बँकेचा (BOI) निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार किंवा वैयक्तिक चौकशी विचारात घेतली जाणार नाही.
  5. कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास, केवळ नवीनतम वैध (पूर्ण केलेला) अर्जच विचारात घेतला जाईल आणि इतर एकापेक्षा जास्त नोंदणीसाठी भरलेले अर्ज शुल्क/सूचना शुल्क जप्त केले जाईल याची नोंद घ्यावी.
  6. अधिक माहिती मिळविण्यासाठी (BOI Recruitment 2025)च्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्यावी.

निष्कर्ष

Bank Of India Recruitment 2025- या भरतीमध्ये निवड होणे म्हणजे योग्य वेतन आणि नोकरीची स्थिरता मिळविणे.तसचे बँकिंग क्षेत्रात चांगल्या पदावरती काम करण्याची संधी मिळविणे होय. म्हणून पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment