Bank Of India Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाची नोकरी शोधताय का? तर मग ही जाहिरात तुमच्यासाठी कारण बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 400 पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती जाहिरात ही बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.सदर भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| अप्रेंटिस ट्रेनी | 400 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अप्रेंटिस ट्रेनी | प्रस्तुत भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.(सविस्तर जाहिरात pdf वाचा) |
वयोमर्यादा (Age Limit)
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य) 20 वर्ष ते 28
- SC/ST अधिक 05 वर्ष
- OBC अधिक 03 वर्ष
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 800/- रुपये
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 600/- रुपये
- Pwd उमेदवारांसाठी -400/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (BOI) बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या .
- Recruitment विभाग निवडून नोंदणी करा आणि login करून संपूर्ण माहिती भरून घ्या.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 25 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 10 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- ऑनलाईन परीक्षा
- स्थानिक भाषा चाचणी
- दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
Bank Of India Bharti 2026
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
- 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा 13,000/- रुपये पर्यंत.
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमेदवाराने यापूर्वी बँक ऑफ (Bank Of India) इंडियामध्ये किंवा इतर कोणत्याही संस्था/प्रतिष्ठानामध्ये शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले नसावे किंवा सुधारित शिकाऊ प्रशिक्षण कायदा 1961 नुसार शिकाऊ प्रशिक्षण घेत नसावे. प्रशिक्षणाचा कालावधी/शिकाऊ प्रशिक्षण किंवा नियुक्तीचा कालावधी 01 वर्ष असेल याची नोंद घ्यावी.
- ज्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी प्रशिक्षण किंवा नोकरीचा अनुभव घेतला आहे, ते शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू होण्यास पात्र नसतील.
- कोणत्याही माजी सैनिकाला/दिव्यांग माजी सैनिकाला शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू केले जाणार नाही आणि शिकाऊ उमेदवारांच्या नियुक्तीमध्ये माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांसाठी कोणतेही आरक्षण नाही.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकेत नोकरीवर दावा करण्याचा अधिकार शिकाऊ उमेदवाराला राहणार नाही.
- शिकाऊ उमेदवारीच्या कालावधीत आणि/किंवा तो पूर्ण झाल्यानंतर, शिकाऊ उमेदवारांना नियमित नोकरी देण्याचे कोणतेही बंधन बँक ऑफ इंडियावर (Bank Of India) राहणार नाही. शिकाऊ उमेदवारीचा कालावधी पूर्ण झाल्यावर, उमेदवारांना आपोआप संबंधित कार्यक्षेत्रातून कार्यमुक्त केले जाईल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
निष्कर्ष
Bank Of India Bharti 2026- पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.म्हणून आपला अर्ज विहित तारखेत सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा