Central Bank of India Bharti 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 350 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी पात्रता धारक उमेदवारांना मिळणार आहे.प्रस्तुत भरती ही Central Bank of India च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| परकीय चलन अधिकारी – स्केल III | 50 |
| विपणन अधिकारी – स्केल I | 300 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| परकीय चलन अधिकारी – स्केल III | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.(अधिकृत जाहिरात pdf वाचावी) |
| विपणन अधिकारी – स्केल I |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General उमेदवारांसाठी – 22 वर्ष ते 35 वर्ष
- SC/ST उमेदवारांसाठी – अधिक 05 वर्ष
- OBC उमेदवारांसाठी – अधिक 03 वर्ष
- PwBD उमेदवारांसाठी – अधिक 10 वर्ष
हि पण भरती महत्वाची: सरकारी: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था (CSIO) भरती 2026| 10 वी/12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 850/- रुपये
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 175/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Central Bank Of India च्या वेबसाइट वर भेट द्या.
- Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
- Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Payment करून अर्ज Submit करा
- अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात – 20 जानेवारी 2026
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 03 फेब्रुवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- ऑनलाइन परीक्षा
- मुलाखत
- दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही Central Bank Of India च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)
Central Bank of India Bharti 2026
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
- पदवी वी उत्तीर्ण गुणपत्रक
- आधार कार्ड/पॅन कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा बेसिक 48480/- रुपये ते 85920/- रुपये पर्यंत
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.
- अर्ज सादर करतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत. एकापेक्षा जास्त अर्ज रद्द केले जातील आणि अर्ज शुल्क जप्त केले जाईल.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने या जाहिरातीत नमूद केलेली पात्रता आणि इतर निकष पूर्ण करतो याची खात्री करावी. एकदा सादर केलेले अर्ज मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि एकदा भरलेले अर्ज शुल्क/सूचना शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी राखीव ठेवले जाणार नाही.
- भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर, उमेदवार ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यासाठी अपात्र आढळल्यास, बँक कोणताही अर्ज नाकारण्यास स्वतंत्र असेल. उमेदवारांची पात्रता, पात्रतेची छाननी कोणत्या टप्प्यावर करायची आहे, पात्रता आणि इतर निकष, सादर करावयाची कागदपत्रे इत्यादी आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींबाबत बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात बँकेकडून(Central Bank of India) कोणताही पत्रव्यवहार किंवा वैयक्तिक चौकशी स्वीकारली जाणार नाही. नियुक्तीनंतरही कोणतीही गैरकृत्ये/माहिती दडपल्याचे आढळल्यास, निवडलेल्या उमेदवारांची सेवा समाप्त केली जाऊ शकते.
- शासकीय/निम-शासकीय/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (राष्ट्रीयीकृत बँका आणि वित्तीय संस्थांसह) कार्यरत असलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी त्यांच्या नियोक्त्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक असेल, अन्यथा त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाणार नाही.
- पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
निष्कर्ष
Central Bank of India Bharti 2026 –बँकिंग क्षेत्रात चांगल्या वेतनाची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा