NHM Dhule Bharti 2026: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे अंतर्गत शहर आरोग्यवर्धिनी केंद्र साठी नवीन पदांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि भरती संदर्भातील नियम व अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.प्रस्तुत भरती ही राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| वैद्यकीय अधिकारी (MBBS) | 02 |
| Staff Nurse (महिला) | 02 |
| MPW (पुरुष) | 01 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वैद्यकीय अधिकारी (MBBS) | MBBS. |
| Staff Nurse (महिला) | GNM / B.Sc. in Nursing. |
| MPW (पुरुष) | १2th passed with Science + Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course. |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी कमाल – 38वर्ष
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी कमाल- 43 वर्ष राहील
हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना धुळे मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 150/- रुपये
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 100/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी नमुना अर्ज खाली देण्यात आला आहे.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात – 08 जानेवारी 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- प्रत्यक्ष मुलखात
- दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| नमुना अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
NHM Dhule Bharti 2026
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, साक्री रोड, धुळे.
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- शाळा सोडण्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- पोलिस चरित्र प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रक
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| वैद्यकीय अधिकारी (MBBS) | 60,000/- रुपये |
| Staff Nurse (महिला) | 20,000/- रुपये |
| MPW (पुरुष) | 18,000/- रुपये |
NHM Dhule Bharti 2026
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- या जाहिरातीमधील पदे हि कंत्राटी अंत्यत तात्पुरत्या स्वरुपाची असून नियुक्ती 11 महिने 29 दिवस कालावधीची म्हणजेच माहे 29 जून 2026 अखेर राहील, व शासनाने सदर पदे नामंजूर केल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल.
- जाहीरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- उपरोक्त कंत्राटी पदांकरीता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
निष्कर्ष
NHM Dhule Bharti 2026- राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत भरती होणे म्हणजे आरोग्य क्षेत्रात चांगला अनुभव घेण्याची सुवर्णसंधी तसेच योग्य वेतन आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील मिळविणे.म्हणुन इच्छुक उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा