BEL Recruitment 2025: चांगल्या वेतनाची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण बघा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
BEL Bharti 2025- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स कंपनी असून,या मध्ये पदवीधर उत्तीर्ण असणाऱ्या नागरिकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 340 जागा भरण्यात येणार असून.पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| प्रोबेशनरी इंजिनिअर | 340 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| प्रोबेशनरी इंजिनिअर | B.E/B.Tech/ B.SC अभियांत्रिकी पदवीधर उत्तीर्ण केलेली असावी. |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
| प्रवर्ग |
वयोमर्यादा 01 ऑक्टोबर 2025 रोजी |
| (General) सामान्य | 25 वर्ष |
| SC /ST | अधिक 05 वर्ष |
| OBC | अधिक 03 वर्ष |
हि पण भरती महत्वाची: ठाणे महानगरपालिका भरती 2025| मासिक वेतन:18,000 ते 20,000 रुपये पर्यंत
नोकरीचे ठिकाण
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये (All India)काम करण्याची संधी आहे.
- GEN/EWS/OBC (NCL)-1180/- रुपये
- SC/ST -अर्ज फी नाही
टीप– परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी BEL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- “Application” विभागात जाऊन संबंधित भरती लिंकवर क्लिक करावे.
- ऑनलाईन अर्ज भरताना सर्व माहिती अचूकपणे नमूद करावी.
- आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, फोटो, सही) अपलोड करावीत.
- General/EWS/OBC उमेदवारांनी फी ऑनलाईन भरावी.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवावी.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 24 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 14 नोव्हेंबर 2025
- परीक्षा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- संगणक आधारित परीक्षा (Computer Based Test)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे/प्रमाणात आवश्यक आहेत.
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- बेसिक 40,000-3%-1,40,000
- CTC: 13 lacs (Approx.)
BEL Recruitment 2025–भरतीचे मुख्य वैशिष्ट्य काय?
- सरकारी संरक्षण क्षेत्रातील नोकरी-BEL ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असल्यामुळे नोकरी स्थिर व प्रतिष्ठित आहे.
- उत्कृष्ट करिअर संधी- Probationary Engineer म्हणून नियुक्तीनंतर उमेदवारांना तांत्रिक तसेच व्यवस्थापन क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळते.
- तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव- BEL मध्ये काम करताना उमेदवारांना रडार, कम्युनिकेशन सिस्टम, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
महत्वाच्या सूचना
- या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना 06 महिन्यांच्या कालावधीसाठी ओरिएंटेशन/ऑन-द-जॉब प्रशिक्षण घेणे आवश्यक असेल. त्यांना कंपनीला 02 वर्षांच्या कालावधीसाठी सेवा देण्यासाठी सेवा करार करणे आवश्यक असेल आणि BEL च्या कोणत्याही युनिट/ कार्यालयात सेवा करण्यास इच्छुक असले पाहिजे.
- या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती कंपनीच्या वैद्यकीय मानकांनुसार कंपनीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीयदृष्ट्या योग्य असल्याचे आढळून येईल.
- कंपनीच्या वैद्यकीय मानकांनुसार, रंगांधळेपणा असलेले उमेदवार प्रोबेशनरी इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, संगणक विज्ञान आणि इलेक्ट्रिकल पदांसाठी योग्य नाहीत.
- कोणत्याही उमेदवाराची निवड न झाल्यास कोणत्याही टप्प्यावर त्यांना स्वतंत्रपणे संपर्क साधला जाणार नाही.
- उमेदवार संगणक आधारित चाचणी प्रश्नपत्रिका आणि मुलाखतीची उत्तरे इंग्रजी किंवा हिंदीमध्ये देण्याचा पर्याय निवडू शकतात.
- ज्या उमेदवारांच्या पदवी प्रमाणपत्रात नमूद केलेले विशेषज्ञता अर्जात नमूद केलेल्या शाखेशी जुळत नाही त्यांना मुलाखतीसाठी विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
निष्कर्ष
BEL Recruitment 2025- भारत सरकारच्या अधिपत्याखाली भारत सरकारच्या अधिपत्याखाली नोकरी मिळवण्याचे ही एक पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी मिळालेली असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनुभव प्राप्त करण्याची आणि योग्य वेतन मिळवण्याची चांगली संधी आहे.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा