10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबई कस्टम्स विभागामध्ये नोकरीची संधी|Mumbai Custom Zone Recruitment 2025

Mumbai Custom Zone Recruitment 2025:10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण,सीमा शुल्क विभागामध्ये नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mumbai Custom Zone Bharti 2025- भारत सरकारच्या महसूल विभाग अंतर्गत सीमा शुल्क विभाग मुबई मध्ये अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 22 पदे भरण्यात येत असून,10 वी पास झालेल्या उमेदवारांना ही करियर सुरू करण्याची मोठ्ठी संधी मिळणार आहे.या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत.त्यासाठी 16 नोव्हेंबर 2025 ही अंतिम दिनांक देण्यात आली आहे.या भरतीविषयी अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पदसंख्या 
कॅन्टीन अटेंडंट 22

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
कॅन्टीन अटेंडंट मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • सर्व उमेदवादांसाठी वय 18 वर्ष ते 25 वर्ष दरम्यान असावे.

हि पण भरती महत्वाची: ठाणे महानगरपालिका भरती 2025| मासिक वेतन:18,000 ते 20,000 रुपये पर्यंत 

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना सीमा शुल्क विभाग मुंबई मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज फी आकारली जाणार नाही त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना देखील अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
  • उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडावीत.आणि पोस्ट लिफाफ्यामध्ये भरून चिकटवून घावा.आणि दिलेल्या पत्ता वरती पोस्ट करावा.
  • चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

टीप: मूळ प्रमाणपत्र अर्जासोबत पाठवू नये. हे फक्त कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावेत.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 18 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 16 नोव्हेंबर 2025
  • परीक्षा  दिनांक – नंतर कळविण्यात येईल.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • लेखी परीक्षा (Written Exam)
  • दस्तावेज पडताळणी (Document Verification)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) क्लिक करा 
नमुना अर्ज क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे 

  • फोटो व स्वाक्षरी
  • आधार कार्ड/पॅन कार्ड
  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
  • वयाचा पुरावा (10 वी गुणपत्रिका/जन्म प्रमाणपत्र)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तीचे प्रमाणपत्र(लागू असल्यास)

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • सहाय्यक कस्टम आयुक्त (कार्मिक आणि आस्थापना विभाग), दुसरा मजला, नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये पर्यंत.

Mumbai Custom Zone Recruitment 2025–भरतीचे मुख्य वैशिष्ट्य?

  • करिअरची सुरुवात –10 वी पास असणाऱ्या तरुण उमेदवारांना आपल्या करिअरची सुरुवात करण्याची ही चांगली संधी आहे.
  • चांगले वेतन – चांगले वेतन आणि सुरक्षितता या भरतीद्वारे मिळणार आहे.
  • सरकारी नोकरी (sarkari job)- भारत सरकारच्या अधिपत्याखाली नोकरी म्हणजे सुरक्षित आणि सरकारी नोकरी होय.

महत्वाच्या सूचना 

  • या भरतीसाठी एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज करावा.
  • उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ओळखपत्राचा मूळ पुरावा असलेले किमान एक फोटो जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, विद्यापीठ/महाविद्यालयाने दिलेले ओळखपत्र, पॅन कार्ड सोबत आणावे, अन्यथा त्यांना परीक्षेसाठी हजर राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रात नोंदवलेली जन्मतारीख (किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समतुल्य प्रमाणपत्र) वय निश्चित करण्यासाठी कार्यालयाकडून स्वीकारली जाईल आणि त्यानंतर बदल करण्याची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही किंवा मंजूर केली जाणार नाही.
  • वय राखीव उमेदवारांसाठी सध्याच्या नियमांनुसार सूट आहे.
  • या भरतीमध्ये पात्रता,अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे, खोट्या माहितीसाठी दंड, निवडीची पद्धत, परीक्षा आयोजित करणे आणि निवडलेल्या उमेदवारांना पदांचे वाटप करणे या सर्व बाबींमध्ये विभागाचा निर्णय उमेदवारांवर अंतिम आणि बंधनकारक असेल आणि या संदर्भात कोणतीही चौकशी/पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ अधिकृत जाहिरात pdf वाचावी.

निष्कर्ष

Mumbai Custom Zone Recruitment 2025-  मुंबई कस्टम झोन-I ही भरती केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत असून, ती सरकारी स्थायी नोकरीसमान करारावर आधारित आहे. कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र शासनाखालील उत्तम नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुकांनी लवकर अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत सादर करावा.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment