Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025: 12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे कारण,आरोग्य खात्यामध्ये नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.ही भरती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने करावयाची आहे.या भरतीमध्ये बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) हे पद भरण्यात येत आहे.त्यासाठी 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज सादर करता येतील.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) | 40 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष):12 वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभुत प्रशिक्षण अभ्यासक्रम किवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
| श्रेणी | वयोमर्यादा 25 एप्रिल 2016 चे शासन निर्णयानुसार |
| अराखीव प्रवर्ग | 38 वर्ष |
| राखीव प्रवर्ग | 43 वर्ष |
हि पण भरती महत्वाची: वनविभाग भरती 2025|मासिक वेतन: 50,000 रुपये|सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.
अर्ज फी
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही म्हणून सर्व सामान्य उमेदवारा सुद्धा अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, फोटो, सही इत्यादी कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत पाठवावीत.
- उमेदवारांनी चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक – 10 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 30 ऑक्टोबर 2025
- मुलाखतीची दिनांक- नंतर कळविण्यात येईल.
निवड प्रक्रिया
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- प्रत्यक्ष मुलखात Interview
- कागदपत्र पडताळणी Document Verification
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025– का निवडावी नोकरी?
- आकर्षक वेतन – सरकारी विभाग असल्यामुळे उत्कृष्ट वेतनश्रेणी व भत्ते.
- नोकरीची सुरक्षितता (Sarkari Job)– सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीमुळे स्थिरता.
- अनुभव संधी – आरोग्य खात्यामधील अनुभव पुढील वाटचालीसाठी खूप मोठा ठरू शकतो.
अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढुन आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स अर्जाला संलग्न करुन मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.
- सदर पदांकरीता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग,3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1,से.15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614
महत्वाच्या सूचना
- उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्ती 6 महिन्यांच्या कालावधी करीता राहील.
- सर्व उमेदवारांनी जाहिरात मध्ये नमुद अर्जा मध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
- अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्दयाची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने आपला सध्याचा पत्ता व कायम स्वरुपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा.
- अर्जामध्ये उमदेवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, (E-mail ID)चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी (Email)पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- अधिक माहितीसाठी pdf जाहिरात वाचावी.
निष्कर्ष
- नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नोकरी मिळविणे म्हणजे योग्य वेतन नोकरीची स्थिरता आणि अनुभव या सर्व बाबीचा समावेश होत आहे.त्यामुळे या भरतीमध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळाली आहे.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा