RRB ALP Bharti 2026: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळविण्याची स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे.कारण भारतीय रेल्वे अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.प्रस्तुत भरती ची जाहिरात ही अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून.,त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण+ Diploma किंवा Engineering केलेले उमेदवार पात्र असणार आहेत.
या भरती मध्ये Assistant Loco Pilot (ALP) हे पद भरण्यात येत आहेत.त्यासाठी 15 मे 2026 ते 16 जून 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांना सरकारी खात्यामध्ये नोकरी मिळविण्याची ही सुवर्णसंधी मिळाली आहे.कारण यामध्ये आकर्षक वेतन तसेच इतर सुविधा देखील दिल्या जातात.भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.मात्र आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf नक्की वाचावी.
सविस्तर तपशील
| घटक | माहिती |
| भरती संस्था | Railway Recruitment Board (RRB) |
| एकूण जागा | 11,127 |
| पदाचे नाव | Assistant Loco Pilot (ALP) |
| अर्ज सुरू तारीख | 15 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 जून 2026 |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| शैक्षणिक पात्रता | 10वी ITI Diploma किंवा Engineering |
| वयोमर्यादा | 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावे. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| अधिकृत संकेतस्थळ | https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281 |
RRB ALP Bharti 2026 या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा असून,नोकरी मिळविण्याची चांगली संधी पात्रता धारक उमदेवारांना आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- 10वी उत्तीर्ण + ITI (संबंधित ट्रेड)
- किंवा Diploma (Mechanical / Electrical / Electronics / Automobile) किंवा Engineering Degree उत्तीर्ण केलेली असावी.( मूळ जाहिरात pdf वाचा)
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय 18 वर्षे
- कमाल वय 30 वर्षे
निवड प्रक्रिया (Selection Process)
- CBT-1 (Computer Based Test – Stage 1)
- CBT-2 (Computer Based Test – Stage 2)
- CBAT (Computer Based Aptitude Test)
- Document Verification
- Medical Examination
पगार (Salary)
निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
- Basic Pay: 19,900 रुपये
- अधिक DA, HRA, Transport Allowance आणि इतर भत्ते देखील मिळणार आहेत.
अर्ज फी (Application Fee)
- सर्वसाधारण उमेदवारांसाठी :-500 /- रुपये
- SC/ST उमेदवारांसाठी:- 250/- रुपये
आवश्यक कागदपत्रे (Required Document)
- फोटो आणि सही
- आधारकार्ड
- 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
- Diploma उत्तीर्ण प्रमाणपत्र
- Enginnering उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जातीचा दाखल (लागू असल्यास)
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा
RRB ALP Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)
- सर्व प्रथम RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
- Registration वरती क्लिक करून आपलं Registration करून घ्या.
- Login करून अधिक माहिती संपूर्ण आणि व्यवस्थित रित्या भरून घ्या.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Payment करून अर्ज Submit करा
- अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
RRB ALP Bharti 2026 Apply Link
महत्त्वाच्या सूचना
- सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी, कृपया या CEN (केंद्रीय रोजगार सूचना) मध्ये दिलेली माहिती सविस्तरपणे वाचावी.
- उमेदवारांनी याची खात्री करावी की, या CEN अंतर्गत अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत किंवा त्यापूर्वी, ते संबंधित पदासाठी विहित केलेल्या सर्व शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता पूर्ण करतात. ज्या उमेदवारांचे विहित शैक्षणिक/तांत्रिक पात्रतेचे अंतिम निकाल अद्याप प्रलंबित आहेत, असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत याची नोंद घ्यावी.
- अर्ज केवळ RRB च्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने सादर केले जावेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी आपली पात्रता निश्चित करण्यासाठी या सविस्तर CEN मधील ‘परिशिष्ट अ’ (Annexure A) आणि ‘परिशिष्ट ब’ (Annexure B) यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानंतरच, उमेदवाराने निवडलेल्या RRB अंतर्गत, संबंधित विभागीय रेल्वे (Zonal Railway) आणि पदांची निवड (Option) करावी.
- एकदा RRB ची निवड करून अर्ज सादर केला की, ती निवड अंतिम मानली जाईल आणि भविष्यात त्यात कोणताही बदल करता येणार नाही. उमेदवार केवळ एकाच RRB कडे अर्ज करू शकतो; तसेच या CEN अंतर्गत अधिसूचित केलेल्या पदासाठी, प्रत्येक उमेदवाराचा केवळ एकच अर्ज स्वीकारला जाईल. या CEN अंतर्गत जो उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज सादर करेल, त्याला अपात्र ठरवले जाईल आणि भरती प्रक्रिया तसेच RRB व RRC च्या भविष्यातील परीक्षांमधून कायमस्वरूपी वगळले जाईल.
- उमेदवारांची पात्रता ही केवळ त्यांनी ऑनलाईन अर्जात दिलेल्या तपशीलांवर आधारित आणि ‘तात्पुरत्या स्वरूपाची’ (Provisional) असेल. RRB कडून पात्रतेच्या संदर्भात अर्जांची सविस्तर छाननी केली जाणार नाही; त्यामुळे, आवश्यक असलेले मूलभूत पात्रतेचे निकष पूर्ण करण्याच्या अटीवरच उमेदवारी तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारली जाईल. उमेदवारांनी शैक्षणिक/तांत्रिक पात्रता, वयोमर्यादा, वैद्यकीय मानके इत्यादींशी संबंधित आवश्यकतांचा काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि आपण संबंधित पदासाठी पात्र आहोत, याची स्वतः खात्री करून घ्यावी. शैक्षणिक पात्रता, वय, जात/प्रवर्ग इत्यादींच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली प्रमाणपत्रे/कागदपत्रे, RRB द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘कागदपत्र पडताळणी’च्या (Document Verification) वेळी सादर करणे आवश्यक असेल.
- कागदपत्र पडताळणीच्या वेळी, शैक्षणिक पात्रता, वय, जात/प्रवर्ग इत्यादींशी संबंधित प्रमाणपत्रे/कागदपत्रांची छाननी केल्यानंतर—जर अर्जात केलेला कोणताही दावा संबंधित प्रमाणपत्रे/कागदपत्रांद्वारे सिद्ध होत नसेल—तर त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. शिवाय, भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर, किंवा त्यानंतरही, जर उमेदवाराविषयीची कोणतीही माहिती असत्य/चुकीची असल्याचे आढळून आले; अथवा उमेदवाराने कोणतीही संबंधित माहिती दडवून ठेवली असल्यास; किंवा उमेदवार सदर पदासाठीचे पात्रता निकष पूर्ण करत नसल्यास, त्याची/तिची उमेदवारी तात्काळ रद्द केली जाईल.
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी
निष्कर्ष
RRB ALP Bharti 2026 ही भरती म्हणजे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.आकर्षक वेतन आणि भविष्यात उच्च पदावर जाण्याची संधी देखील आहे.त्यामुळे पात्र उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
हि जाहिरात पण बघा SBI Bharti 2026 : स्टेट बँकेत 100 जागांसाठी भरती, पगार ₹93 हजारांपर्यंत
7350963443