SBI Bharti 2026 : स्टेट बँकेत 100 जागांसाठी भरती, पगार ₹93 हजारांपर्यंत

SBI Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय का? तर मग मी जाहिरात तुमच्यासाठी.नमस्कार मित्रानो आज आपण SBI Bharti 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यामध्ये एकूण 100 पदे भरण्यात येत आहेत.

प्रस्तुत भरतीची जाहिरात ही स्टेट बँक (SBI) ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची ही एक उत्तम संधी उमेदवारांना मिळणार आहे.भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे,मात्र आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.

सविस्तर तपशील

घटक            माहिती
भरती संस्था.  स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
एकूण जागा  100
पदाचे नाव  ट्रेड फायनान्स ऑफिसर
अर्ज सुरू तारीख   13 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची  तारीख   तारीख 02 जून 2026
अर्ज पद्धत ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात पदवी
वयोमर्यादा 23 वर्षे ते 32 वर्षे दरम्यान असावे
नोकरी ठिकाण  हैदराबाद किंवा कोलकाता
अधिकृत संकेतस्थळhttps://sbi.bank.in/

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी आणि जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.त्यामुळे या भरतीमध्ये निवड होणे म्हणजे नोकरीची स्थिरता आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • उमेदवाराकडे IIBF कडून मिळणारे ‘Certification in Forex Operations’ हे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र 30 एप्रिल 2026 पर्यंत प्राप्त केलेले असावे. त्यासोबतच जर तुमच्याकडे CDCS सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल.
  • (अधिकृत जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय 23 वर्षे
  • कमाल वय  32 वर्षे
  • SC/ST उमेदवारांसाठी: 05 वर्षे सूट
  • OBC उमेदवारांसाठी:  03 सूट

निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. शॉर्टलिस्टिंग
  2. मुलाखत

पगार (Salary)

निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.

  • दरमहा 64,820/- ते 93,960/- रुपये (अधिक DA आणि HRA लागू)

अर्ज फी (Application Fee)

  • General/EWS/OBC उमेदवारांसाठी:-  750/- रुपये
  • SC/ST उमेदवारांसाठी:- फी नाही

आवश्यक कागदपत्रे (Required Document)

  • फोटो आणि सही
  • आधारकार्ड
  • पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा

अर्ज कसा करावा (How to Apply)

  • SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट भेट द्या.त्यानंतर Current opening जाहिरात क्रमांक (CRPD/SCO/2026-27/05) search करा
  • Apply Online वरती क्लिक करून आपलं Registration करून घ्या.
  • Login करा आणि संपूर्ण माहिती भरून घ्या.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि Payment करून अर्ज Submit करा.
  • अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.

SBI Bharti 2026 Apply Link

SBI Bharti 2026 का निवडावी?

  • नोकरीची सुरक्षा आणि स्थिरता

SBI ही सरकारी क्षेत्रातील बँक असल्याने येथे नोकरीची पूर्ण सुरक्षा मिळते. खाजगी क्षेत्रातील कंपन्यांप्रमाणे येथे मंदी किंवा अचानक होणाऱ्या ले-ऑफची (Layoffs) भीती नसते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित राहते.

  • आकर्षक वेतन आणि भत्ते

SBI आपल्या कर्मचाऱ्यांना बाजारातील सर्वोत्तम वेतनश्रेणी प्रदान करते. मूळ वेतनाव्यतिरिक्त (Basic Pay) कर्मचाऱ्यांना अनेक उत्तम भत्ते मिळतात.

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरती उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध Email id आवश्यक आहे.
  2. कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की, नमूद केलेल्या तारखेनुसार तो/ती त्या पदासाठी वर नमूद केलेली पात्रता आणि इतर निकष पूर्ण करतो.तसेच, त्याने सादर केलेली सर्व माहिती सर्वार्थाने अचूक आहे.
  3. राखीव प्रवर्गातील उमेदवार (ज्यांच्यासाठी कदाचित स्वतंत्र आरक्षण नमूद केलेले नसेल, अशा उमेदवारांसह) ‘सर्वसाधारण प्रवर्गासाठी’ (General Category) जाहीर झालेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास मुक्त आहेत; मात्र, त्यांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी लागू असलेल्या पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे.
  4. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आल्यास की, एखादा अर्जदार पात्रतेचे निकष पूर्ण करत नाही आणि त्याने कोणतीही चुकीची/असत्य माहिती सादर केली आहे, अथवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती दडवून ठेवली आहे, तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  5. केवळ अर्ज सादर केला म्हणजे मुलाखतीसाठी बोलावले जाईलच असे नाही; आवश्यक संख्येनुसार उमेदवारांची छाननी (screening) करून त्यांची पदासाठीची उपयुक्तता तपासली जाईल.
  6. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.

निष्कर्ष

SBI Bharti 2026 ही भरती पदवीधर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.तसेच नोकरीची स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्याची संधी आहे.त्यामुळे विहित तारखेत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

हि जाहिरात पण बघा Indian Army TES Bharti 2026: 12वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

1 thought on “SBI Bharti 2026 : स्टेट बँकेत 100 जागांसाठी भरती, पगार ₹93 हजारांपर्यंत”

Leave a Comment