Income Tax Department Mumbai Bharti 2026: आयकर विभाग मुंबई अंतर्गत 97 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून,पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रस्तुत भरतीमध्ये कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड -II, मल्टी टास्किंग स्टाफ.पदे भरण्यात येत असून,उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| कर सहाय्यक | ४७ |
| स्टेनोग्राफर ग्रेड II (स्टेनो) | १२ |
| मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) | ३८ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कर सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता असावी. |
| स्टेनोग्राफर ग्रेड II (स्टेनो) | मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) | मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य)- 18 वर्ष ते 27 वर्ष
- SC/ST 05 वर्ष सूट
- OBC 03 वर्ष सूट
हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 200/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
- Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची हार्ड कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात – 08 जानेवारी 2026
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 31 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- मूळ जाहिरात pdf वाचावी.
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही आयकर विभाग मुंबईच्या (Income Tax Department)अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- 10 वी/12 वी उत्तीर्ण गुणपत्रक
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
| पदाचे नाव | वेतन |
| कर सहाय्यक | वेतन स्तर -४ (२५५०० ते ८११००) |
| स्टेनोग्राफर ग्रेड II (स्टेनो) | वेतन स्तर -४ (२५५०० ते ८११००) |
| मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) | वेतन स्तर-१ (१८००० ते ५६९००) |
Income Tax Department Mumbai Bharti 2026
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी प्रविष्ट करावा.
- या भरतीसाठी नियुक्तीनंतर, उमेदवाराची पोस्टिंग प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई विभागामध्ये केली जाईल.
- निवडलेले उमेदवार भारत सरकारच्या सध्याच्या सूचनांनुसार 02 वर्षांच्या किंवा अशा कालावधीसाठी परिवीक्षाधीन असतील.
- स्टेनोग्राफर ग्रेड-II पदावरील नियुक्तीच्या संदर्भात, निवडलेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक असेल. यासाठी, विभागामध्ये रुजू होण्यापूर्वी संबंधित भरती नियमांमधील तरतुदींनुसार, श्रुतलेखन चाचणी 10 मिनिटांसाठी 80 शब्द प्रति मिनिट वेगाने आणि प्रतिलेखन केवळ संगणकावर 50 शब्द प्रति मिनिट (इंग्रजी) आणि 65 शब्द प्रति मिनिट (हिंदी) वेगाने असेल.
- कर सहाय्यक पदावरील नियुक्तीच्या संदर्भात, निवडलेल्या उमेदवारांना विभागामध्ये रुजू होण्यापूर्वी संबंधित भरती नियमांमधील तरतुदींनुसार, प्रति तास 8000 की-डिप्रेसन्सच्या वेगाने डेटा एंट्री कौशल्य चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक असेल.
- निवडलेल्या उमेदवारांनी बोलावले असता संबंधित मूळ प्रमाणपत्रे सादर करावीत.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
निष्कर्ष
Income Tax Department Mumbai Bharti 2026– सरकारी विभागात चांगली नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. म्हणून विहित तारखेत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
It’s online or offline